ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून गरोदर विवाहितेची आत्महत्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून गरोदर विवाहितेची आत्महत्या

शहर : पुणे

वैष्णवी सिटी हांडेवाडे रस्ता देवाची उरुळी येथे सासु-सासरे आणि नवरा यांच्या सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन सात महिन्याच्या गरोदर विवाहितेने तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून नवर्‍यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार सिध्दप्पा जट्टेपळगोट (24) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अश्विनी ओंकार जट्टेपगोळ (19) हिचा ओंकार याच्याशी विवाह झाला. ओंकार हा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. लग्न झाल्यानंतर सासरी नांदत असताना पतीसह सासु आणि सासरे यांनी संगनमत करुन तिचा शाररीक व मानसिक छळ सुरु केला. अश्विनी सात महिन्यांची गरोदर असताना देखील सासरच्या मंडळींकडून तिला त्रास सहन करावा लागत होता. शेवटी तिला हा शाररीक व मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने माहेरी तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम एच तडवी पुढील तपास करीत आहेत.

मागे

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला आग
भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला आग

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्....

अधिक वाचा

पुढे  

आंबेगाव तालुक्यातील घराला लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा होरपळून मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील घराला लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

वळती जवळ असलेल्या गांजवेवाडीत शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कौलारू घ....

Read more