ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2020 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

शहर : मुंबई

44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.मानखुर्द परिसरात 24 जून रोजी घडलेला प्रकार काल उघडकीस आला. वाढदिवसाच्या बहाण्याने पीडित महिलेला घरी नेऊन कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध टाकून गँगरेप झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी लेबर कॅम्प धारावी येथे राहतात.

आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याचा मित्र मुरादच्या मुलाचा वाढदिवस आहे असं खोटे सांगून आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतले. येथे पीडित महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप आहे. या सर्व प्रकरणानंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला त्रास होऊ लागल्याने महिलेने वैद्यकीय तपासणी केली. यावेळी महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी ओरखडल्याचा आणि इतर जखमा, चिमटे काढले असल्याचे दिसून आले. त्यावर त्यांना हजर असलेल्या चारही इसमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा दावा पीडित महिलेने केला. त्यानंतर पीडित महिलेने 1 जुलै रोजी चारही आरोपीविरोधात तक्रार मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

मागे

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात

लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिक....

अधिक वाचा

पुढे  

रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट
रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ....

Read more