ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 12, 2020 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात

शहर : देश

लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिकाऱ्याचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. यामध्ये आणखी काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. हे सर्वजण सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात वाहन घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांकडे कर्फ्यु पासची विचारण केली. मात्र, या टोळक्याकडे कोणतेही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.

एवढेच नव्हे तर या टोळक्याने पोलिसांवर लावलेल्या बॅरिकेटसवर गाडी घातली. यानंतर त्यांनी गाडीतून खाली उतरत पोलिसांवर हल्ला केला. यापैकी एकाने सहायक पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग यांचा हात तलवारीने कापून टाकला. तर अन्य दोन अधिकारीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर निहंग्यांचे हे टोळके बलबेडा परिसरातील खिसरी साहेब गुरुद्वारात जाऊन लपून बसले आहे. पोलिसांनी या गुरुद्वाराला घेरले असून या सर्वांना शरण येण्यास सांगितले आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १३२ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, देशातील इतर भागांप्रमाणे याठिकाणीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यापूर्वी गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही पोलीस डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मागे

याकूबपासून कसाबपर्यंत, गेल्या तीन दशकांत १६ दोषींना फाशी
याकूबपासून कसाबपर्यंत, गेल्या तीन दशकांत १६ दोषींना फाशी

निर्भया प्रकरणातील दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. स्वातंत्र....

अधिक वाचा

पुढे  

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप
वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.....

Read more