ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस

शहर : पुणे

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबत नाहीये. तरी, पुणेकर अद्यापही बेफिकीर सारखे वागताना दिसत आहेत. पुण्यात नुकताच एक लग्न सोहळा पार पडला. फक्त 50 जणांची परवानगी असतानाही लॉकडाऊनच्या सर्व नियमांची पायमल्ली करत तब्बल 250 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा कोरोनानमुळे मृत्यू झाला आहे. 30 जूनला हा लग्न सोहळा पार पडला.

लॉकडाऊन काळात हॉटेलमध्ये लग्न सोहळा करणे या हॉटेलला चांगलच महागात पडलं आहे. लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या पंचतारांकित हॉटेलला नोटीस पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील नगररोडवरील हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या लग्नात तब्बल 250 वऱ्हाडी उपस्थित होते. लग्न सोहळ्याला उपस्थित 25 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उपस्थितांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर कपिल राजेश गर्ग, विशाल उमेशचंद्र तिवारी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

 

मागे

मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा
मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा

ऐन कोरोनाच्या काळात झांबियात व्यवसाय असलेल्या दोन भारतीयांनी पुणे शहराती....

अधिक वाचा

पुढे  

वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

डॉक्‍टरांकडून कोरोनाच्या रुग्णांना हाताळताना वापरात आलेले रबरी हातमोजे ....

Read more