ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2020 09:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

शहर : मुंबई

डॉक्टरांकडून कोरोनाच्या रुग्णांना हाताळताना वापरात आलेले रबरी हातमोजे धुवून करुन (Used Rubber Gloves Re-sale) पुन्हा विक्री करणारी टोळी नवी मुंबईत सक्रीय झाली आहे. वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा विक्री करताना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला रंगेहात अटक केली. या व्यक्तीच्या अटकेनंतर पोलिसांना छापा टाकला असता 4 लाख नग हातमोजे आणि इतर मुद्देमाल असा एकूण 6 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदर प्रकरणात पोलिसांना आढळून आलेल्या साहित्यावरुन मोठी टोळी सक्रीय असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले रबरी हातमोजे वापरलेले तर नाहीत ना, अशी भीती नागरिकांच्या मानात निर्माण झाली आहे.

देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णांना हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी आणि पुरवठा लक्षात घेता उत्पादन कमी असल्यामुळे काही ठिकाणी आवश्यक साहित्यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा धुवून वापरण्याची क्लृप्ती नवी मुंबईत काही अज्ञातांनी शोधून काढली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून या टोळ्यांचा मनसुबा धुळीस मिळवला आहे. पावणे एमआयडीसीतील गामी इन्डस्ट्रीअल पार्क येथे गाळा क्रमांक 29 आणि 80 येथे काही व्यक्ती कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी वापरण्यात आलेले रबरी हातमोजे धूवून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल राख यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत डॉक्टरांनी वापरलेले, धुतलेले धुतलेले तीन ते चार क्विंटलच्या अशा एकूण 263 गोण्या सापडल्या. या गोण्यांमध्ये डॉक्टरांनी वापरलेले निळ्या रंगाचे अंदाजे 4 लाख नग हातमोजे एका पाकिटात भरुन ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, हातमोजे धुण्यासाठी दोन वॉशिंग मशिन, धुतलेले हातमोजे सुकवण्यासाठी ब्लोअर मशिन, पॅकिंगचे साहित्य असा एकूण 6 लाख 10 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात घटनास्थळाहून प्रशांत सुर्वे या इसमाला ताब्यात घेतले आहे. डॉक्टरांकडून कोव्हिड रुग्णांसाठी वापरण्यात आलेले निळ्या रंगाचे रबरी हातमोजे नष्ट करण्याऐवजी काही इसम टोळीने बेकायदेशीररीत्या या वापरलेल्या रबरी हाजमोज्यांना धुवून पुन्हा विक्रीसाठी वापरत असल्याचा दाट संशय गुन्हे शाखेतर्फे व्यक्त केला जात आहे.

हातमोजे गोळा करण्यासाठी मजुरांचा वापर

दवाखान्यांमधून गोळा करण्यात आलेले वापरलेले रबरी हातमोजे काढून त्याचे वर्गीकरण करण्यासाठी 200 रुपयांच्या रोजंदारीवर मजूर घेण्यात आले होते. मजुरांच्या मदतीने रोज येणारे वापरलेले हातमोजे काढून मशिनमध्ये धुवून ते सुकवून नंतर पुन्हा एका चांगल्या पाकीटात विक्रीसाठी भरले जात होते.

मागे

पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस
पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबत नाहीये. तरी, पुणेकर अद्यापही बेफ....

अधिक वाचा

पुढे  

महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सोमवारी सायंकाळच्या सुमारास  महाड शहरात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घ....

Read more