ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनुज केसरकर यांना राष्ट्रीय गोमंतक पुरस्कार प्रदान

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अनुज केसरकर यांना राष्ट्रीय गोमंतक पुरस्कार प्रदान

शहर : madgaon

        गोवा - मडगाव येथे दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. हुतात्मा अपंग बहुउद्देशीय संस्था विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


         यावेळी साहित्य विभागातून राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार अनुज केसरकर यांना प्रदान करताना केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सोबत फातोड्रा मतदारसंघाचे माजी आमदार दामोदर नाईक. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयोजक सुनील फडतरे संस्थेच्या संचालिका व निवेदिका राजश्री सावंत मॅडम उपस्थित होत्या. 


       हा पुरस्कार आयोजन करणारा माणूस दृष्टीने अंध पण मनाने डोळस होता. त्या माणसाचा हा पुरस्कार घेताना एक कळलं या बहुआयामी जीवनाकडे व साहित्याकडेही डोळस नजरेने पहायला हवं. पुरस्काराच्या जास्त भानगडीत न पडणारा मी पण आमच्या राजश्री सावंत यांच्या आपुलकीच्या हाकेमुळे माझ्या गोव्यात हा पुरस्कार घेण्याचा मला योग आला आणि जाणीव झाली. जे काही लिहितोय ते भरीव पणे लिहायला हवं. या पुरस्कारामुळे ते शहाणंपण आणखी सजग झालं.
 

मागे

नाताळ सणाचं उत्साहाने स्वागत
नाताळ सणाचं उत्साहाने स्वागत

         मुंबई - डिसेंबर महिना उजाडल्यानंतर सर्वांनाच चाहूल लागते ती म्....

अधिक वाचा

पुढे  

जागतिक ग्राहक दिन.....
जागतिक ग्राहक दिन.....

ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात....

Read more