ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 25, 2024 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

  'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

शहर : देश

काय म्हणता हे पाकिस्तानचं राष्ट्रगीत आहे? तुम्हीही असा विचार करत असाल तर आधी ही माहिती पाहा आणि या गीताचा अर्थ जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' हे गीत.

या गीताचा इतिहासही फार रंजक...

लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे गीत लिहिलं होतं. भारतात हे गीत त्या काळात ब्रिटीशांविरोधातील लढ्यात 'रेजिस्टंस गीत' म्हणून गायलं जात होतं किंबहुना भारतात हे गीत आजाही अनेक शाळांमध्ये गायलं जातं.

'ताराना-ए-हिंद'विषयी काही खास गोष्टी...

असं म्हटलं जातं की, महात्मा गांधी यांना जेव्हा 1930 मध्ये येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी 100 हून अधिक वेळा हे गीत गायलं होतं. पंडित रविशंकर यांनी 1945 मध्ये या गाण्याला चाल दिली होती. ज्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत ध्वनीमुद्रित करण्यात आलं. कालांतरानं हे गीत भारतीय लष्कराचं मार्चिंग साँग म्हणूनही निवडण्यात आलं.

गेल्या काही काळापासून मात्र भारतात उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी गटांनी इकबाल यांच्या या गीतावरही आक्षेप घेत हे पाकिस्तानचं राष्ट्रीय गीत असल्याचा सूर आळवला होता. पण, प्रत्यक्षात तसं नसून, पाकिस्तानचं राष्ट्रीय गीत हफ़ीज़ जालंधरी यांनी लिहिलं असून, त्याला अकबर मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलं होतं.

'सारे जहाँ से... ' या गीताचा अर्थ आणि त्याचा अर्थही समजून घ्या

संपूर्ण जगात हा आमचा हिंदुस्तान सर्वोत्तम आहे. आम्ही या देशात स्वछंदी स्वैर असणाऱ्या पक्ष्यांप्रमाणं असून ही आमची बाग आहे. आम्ही परदेशात असलो तरीही ही मातृभूमी आमच्या हृदयात कायम असते. भारतातील पर्वतांपासून इथं वाहणाऱ्या नद्यांचाही उल्लेख या गीतांमध्ये आहे. या देशातील धर्म कधीच आपापसांतील वैर, द्वेषभावना शिकवत नाही, तर आपण हिंदुस्तानी आहोत हीच ऐक्याची भावना या देशातील नागरिकांच्या मनात आहे. गीतकारानं स्वानुभवातून या गीतातील प्रत्येक शब्दामध्ये भावना गुंफल्या आहेत असंच हे गीत वाचताना लक्षात येतं.

 

"सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा।

हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्ताँ हमारा॥"

 

"ग़ुरबत में हों अगर हम, रहता है दिल वतन में।

समझो वहीं हमें भी, दिल हो जहाँ हमारा॥ सारे..."

 

"परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमाँ का।

वो संतरी हमारा, वो पासबाँ हमारा॥ सारे..."

 

"गोदी में खेलती हैं, उसकी हज़ारों नदियाँ।

गुलशन है जिनके दम से, रश्क--जिनाँ हमारा॥ सारे...."

 

" आब--रूद--गंगा! वो दिन है याद तुझको।

उतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा॥ सारे..."

 

"मज़हब नहीं सिखाता, आपस में बैर रखना।

हिन्दी हैं हम वतन हैं, हिन्दोस्ताँ हमारा॥ सारे..."

 

"यूनान-ओ-मिस्र-ओ-रूमा, सब मिट गए जहाँ से।

अब तक मगर है बाक़ी, नाम-ओ-निशाँ हमारा॥ सारे..."

 

"कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।

सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा॥ सारे..."

 

"'इक़बाल' कोई महरम, अपना नहीं जहाँ में।

मालूम क्या किसी को, दर्द-ए-निहाँ हमारा॥ सारे..."

मागे

माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; जाणून घ्या शुभ मुहूर्त
माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2021) , त्यानिमित्ताने गणरायाच्या मंदिरात भाविकांची मोठ....

अधिक वाचा