ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; जाणून घ्या शुभ मुहूर्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 15, 2021 09:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; जाणून घ्या शुभ मुहूर्त

शहर : मुंबई

आज गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2021) , त्यानिमित्ताने गणरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे पासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा (Ganesh Jayanti 2021)  लावल्या आहेत. संगीत, यज्ञ, महाआरती आणि विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा पार पडणार असून मंदिर परिसरात फुलांची विशेष आरास करण्यात आली आहे. तसेच मुंबईत सिद्धिविनायकाच्या मंदिरातही गणेश जन्म सोहळ्यासाठी पाळणा तयार करण्यात आला असून मंदिर परिसरात मोठा उत्साह बघायला मिळत आहे. PUNE GANESH JAYANTI

गणेशजन्मानिमित्त 'दगडूशेठ' ला स्वराभिषेक, गणेश जागर आणि जन्म सोहळा उसा उत्सव साजरा होणार आहेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. बाप्पाच्या मंदिरात फुलांची आरास विद्युतरोषणाई असल्यामुळे वातावरण अतिशय मंगल आहे.

गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त

गणेश जयंतीची तिथि- १५ फेब्रुवारी २०२१, सोमवारी

चतुर्थी तिथि आरंभ- १५ फेब्रुवारी २०२१, सोमवारी रात्री .५८ वाजता

चतुर्थी तिथि समाप्त- १६ फेब्रुवारी २०२१, मंगळवारी पहाटे .३६ वर

गणेश जयंती पूजा मुहूर्त१५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजून २८ मिनिटे ते दुपारी वाजून ४३ मिनिटे

पूजेचा कालावाधी - तास १४ मिनिटे

गणेश जयंती१५ फेब्रुवारी पहाटे वाजून ५९ मिनिटे आणि सायंकाळी वाजून २९ मिनिटे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज  बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहाटे ते सकाळी यावेळेत इंडियन आयडॉल फेम नंदिनी अंगद गायकवाड यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केलं . स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. दुपारी ते सायंकाळी यावेळेत सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, रात्री १० ते पहाटे वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

 

मागे

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!
शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!

धन प्राप्तिसाठी, हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठी, शनिच्या अवकृपेपासून वाचण....

अधिक वाचा

पुढे  

  'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक
'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

काय म्हणता हे पाकिस्तानचं राष्ट्रगीत आहे? तुम्हीही असा विचार करत असाल तर आध....

Read more