ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कवी केशवसुत पुलाखालील बजबजपुरी !

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 03:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कवी केशवसुत पुलाखालील बजबजपुरी !

शहर : मुंबई

दादरच्या पश्चिमेस फुलबाजारजवळ असलेल्या कवी केशवसुत पुलाखाली बजबजपुरी माजली आहे.पुलाखाली लोकांना जाण्यायेण्याच्या मार्गावर मध्यभागी अनेक दुचाकी वाहने पार्क केलेली असतात. ज्या ठिकाणी फेरीवाल्यांनी बस्तान बांधू नये म्हणून महापालिकेने अडथळे लावलेले आहे त्या अडथळ्याच्या मध्येही दुचाकी वाहने लावलेली असतात . याठिकाणी पालिकेने नो पार्किंगचा बोर्ड लावणे गरजेचे आहे.काही ठिकाणी काही लोकानी घरासारखे वास्तव्य केलेले आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काही लोक झोपलेले असतात.चौकशीअंती कळले की हे गर्दुल्ले आहेत व पालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍यांला त्यांना उठविण्याची हिम्मत होत नाही. पालिकेने या पुलाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर स्वच्छ मुंबई सर्वेक्षण अंतर्गत एक पाऊल पुढे असे रंगविले आहे पण त्याचा काय उपयोग ? या ठिकाणी महापालिकेची वाहने व पालिका कर्मचारी व पोलीस सदैव हजर असतात पण या सर्व प्रकाराकडे ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात की काय अशी शंका येते.अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.फेरीवाले आपले सामान पुलाखालीच ठेवतात. या सर्व प्रकारामुळे लोकांना फार त्रास होत आहे.तरी दादर वार्डच्या संबंधित अधिकार्‍यांनी , आरटीओ व पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ही बजबजपुरी नष्ट करावी.
अरुण पां. खटावकर
लालबाग 400 012

 

मागे

भाजपमुक्त करणे मनसेला जमेल ?
भाजपमुक्त करणे मनसेला जमेल ?

लोकसभेची निवडणूक लढविणार नाही असे मनसेने स्पष्ट केले तरी लोकसभेची एक तरी ज....

अधिक वाचा

पुढे  

बेस्ट जगली पाहिजे पण ....
बेस्ट जगली पाहिजे पण ....

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर कोर्टाच्या....

Read more