ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपमुक्त करणे मनसेला जमेल ?

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपमुक्त करणे मनसेला जमेल ?

शहर : मुंबई

लोकसभेची निवडणूक लढविणार नाही असे मनसेने स्पष्ट केले तरी लोकसभेची एक तरी जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साहाय्याने जिंकून दिल्ली गाठण्याची स्वप्ने मनसेने पाहिली नाहीत असे नाही पण काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास नकार दिला आणि तेथेच सर्वकाही फसले.आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींमुक्तचा नारा देऊन मनसैनिकानी भाजप सोडून कोणालाही मतदान करा असा आदेश दिला.दहा वर्षांपूर्वी पहिल्याच फटक्यात मिळविलेले यश मनसेला राखता आले नाही.जवळचे सारे दुसऱ्या पक्षात का गेले ? याचा विचार राज ठाकरेंनी केला नाही .आज मनसेचे कर्तृत्व काहीच नसले तरी राज ठाकरेंच्या वक्तृत्वावर पक्ष टिकून आहे.२०१४ मध्ये याच राज ठाकरेंनी मोदींचे गुणगान गाताना काँग्रेस-राष्ट्रवादीने  मोदींचे पाय धुऊन पाणी प्यावे अशी वक्तव्ये केली होती.राज ठाकरेंची काही वक्तव्येही जनतेच्या पचनी पडत नाहीत म्हणून लोक त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करतात.सध्या मनसे हा पक्ष राज्यात नगण्य अवस्थेत आहे.बोटावर मोजता येतील एवढे नेते त्यांच्याकडे उरलेत. उलट मोदींचा भाजप हा देशात नव्हे तर राज्यात मजबूत स्थितीत आहे.अनेक पक्ष एकत्र येऊनही मोदींना आणि भाजपला हटविणे मुश्किल आहे हे चाणक्य शरद पवारांना सुदधा माहीत आहे कारण शरद पवारांनी आजपर्यंत भाजपा मुक्त भारत किंवा महाराष्ट्र अशी घोषणा केव्हाच केली नाही .अश्या परिस्थितीत राज ठाकरेंना देशाचे भवितव्य ठरविण्याचा अधिकारच नाही .कोठे देशभर पसरलेला भाजप आणि कोठे प्रादेशिक पक्ष मनसे ?

अरुण पां. खटावकर
लालबाग ४०० ०१२

मागे

वडाच्या पारावर
वडाच्या पारावर

गण्या - : अरे संत्या जेवाण झाल का न्हाय अजून  संत्या -: हे बघ आताच हातावर पाणी ....

अधिक वाचा

पुढे  

कवी केशवसुत पुलाखालील बजबजपुरी !
कवी केशवसुत पुलाखालील बजबजपुरी !

दादरच्या पश्चिमेस फुलबाजारजवळ असलेल्या कवी केशवसुत पुलाखाली बजबजपुरी माज....

Read more