ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिक्षणाचे महात्म्य

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 08:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिक्षणाचे महात्म्य

शहर : मुंबई

शिक्षण हे सर्व सुधारणांचे प्रवेशद्वार आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शिक्षणाला ज्ञानाचा तिसरा डोळा म्हटलेले आहे. शिक्षणाला हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीच्या तत्त्व बोधा सारखे आहे. या गोष्टींतील प्रत्येक आंधळा, हत्तीच्या ज्या-ज्या आवयवास स्पर्ष करतो त्याप्रमाणे त्याला तो हत्ती भासतो उदा ः जो आंधळा हत्तीच्या पायाला स्पर्ष करतो त्याला हत्ती ‘खांबा’ सारखा वाटतो. जो आंधळा हत्तीच्या कानाला स्पर्ष करतो. त्याला हत्ती सुपा सारखा वाटतो. या रुपक कथेचा अर्थ इतकाच आहे. की, परमेश्वर एकच आहे. पण ज्या व्यक्तीला परमेश्वराची जशी अनुभूती येते त्याप्रमाणे परमेश्वर त्यास तसा वाटतो. असेच शिक्षणच्या महात्म्य बाबत सामर्थ आणि शक्ती बाबत म्हणता येईल. ज्या  व्यक्तीला शिक्षणाचा जसा उपयोग म्हणता येईल. शिक्षणाचे असे महत्त्व जाणून घेता येईल तसे त्याला तिला शिक्षणाचे मोल कळू लागले. श्रीपद भगवत गीतेत म्हटल्या प्रमाणे “॥ न हि ज्ञानेन् सदृश पवित्र मि ह विद्यते।” ज्ञाना सारखे अन्य दुसरे काहीही पवित्र नाही यावरून ज्ञानाचे महात्म्य अधोरोखित होते. 
अनादी काळापासून समाजात कमी आधिक प्रमाणात बदल झालेले आहेत. होत आहेत. यापुढेही  होत रहातील बदल हा काळाचा अविभाज्य भाग आहे. आणि शिक्षण हा त्याचा आत्मा आहे. म्हणून शिक्षणाी समृध्दी व्यक्तीला, कुटुंबाला समाजालाख् अंतिमतः देशाला फारच प्रेरक आणि उपकारक असते. महान शिक्षण तज्ञांनी विचारवंतानी शिक्षणाच महत्त्व सामर्थ आणि शक्ती सांगितलेली आहे. मोठ्या मोठ्या महासत्ता राजे महाराजे शिक्षणापुढे ज्ञानवंत गुणवंत आणि  प्रज्ञावंता पुढे झुकलेले आहेत. शक्तीशाली सामर्थ्यवान राजे महाराजे शिक्षणाने अलंकृत असलेल्या पुढे नतमस्तक झालेले आहेत. ज्यांनी  ज्यांनी शिक्षाणाच पुढे सामर्थ्य ओळखून, शिक्षण प्रसारस प्रोत्साहन दिले. त्यांचा  इतिहासाने  सदैव उदो उदोच केला आहे. उदाहरणे जगभराच्या इतिहासात विखुरलेली आहेत. आजही ती वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. पण ज्यांनी ज्यांनी विद्यावानाचा अनादर केला, शिक्षणाची हेळसांड केली. अंतिमतः  त्यांचाही नाश झाला. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते’ असे जे म्हटले  जाते ते योग्यच आहे. गणपती हे विद्येचे ज्ञानाचे प्रतिक असल्यामुळेच कोणत्याही ‘शुभ’ उपक्रमास त्यास आग्रपूजेचा मान मिळतो.
शिक्षण हे ज्ञान सापेक्ष असावे म्हणजे शिक्षणाने त्या-त्या व्यक्तींच्या ज्ञानाचे क्षितीज विस्तारत जावे  दृष्टीकोन विशाल व्यापक आणि सर्व समावेशक होत जावा असे अपेक्षित असते. ज्ञान घेणार्‍याच्या आणि ज्ञान देणार्‍याच्या प्रक्रियेत हीच विचारधारा महत्त्वाची आहे. शिक्षण हे ज्ञानवर्धक, जीवन उध्दारक आणि ज्ञान देणार्‍याच्या प्रक्रियेत हीच विचारधारा महत्त्वाची आहे. शिक्षण हे ज्ञानवर्धन जीवन उध्दाराक आणि प्रगल्भत वाढविणारे असावे हाच ज्ञान देण्याचा आणि घेण्याचा उद्देश असावा असे शिक्षणशास्त्र सुचित करते. पण शिक्षणशास्त्रा हा उद्देश किती प्रमाणात आणि कोठे कोठे सफल होतो? हा संशोधानाचा आणि वादाचा मुद्दा आहे. जेव्हा शिक्षणाच्या वरील मुलभूत हेतूंना आणि उद्दीष्टांना हरताळ फासून अथवा त्याकडे सुईस्कार दुर्लक्ष करून पोटार्थी पण जेव्हा शिक्षणात शिरते. तेव्हा व्यक्ती कुटुंब समाज  आणि देश ही कमकुवत होतो. जेव्हा शिक्षणाती गुणवत्ता अणि जीवन मुल्य हरवतात. तेव्हा सर्वोच्च आयुष्यला एक प्रकारचं बकाळपण येते त्यामुळेच सर्वांगीन प्रगती थांबते. शिक्षण हे सर्व सुधारणांचे प्रवेशद्वार आणि  असल्यांनतर शिक्षाणाचा दोष नाही. शिक्षण हे साधान म्हणून वापरणार्‍यांचा दोष आहे. आग्निने चूल पेटवून अन्नही शिजवता येते आणि भूक शांत करता येते पण या आग्नीने  घरेदारे ही पेटविता येतात. गुरेढेरे माणसे आदी जाळून टाकता येतात. एखाद्या सुरीने मधुर रसाळ फळ कापता येते. त्याचप्रमाणे त्या सुरीचा गैरवापर करून एखाद्याला इजा पोहचविता येते. अथवा  खूनही करता येतो येथे त्या आग्निचा अथवा सूरीचा  दोष नसतो. तर तो वापर करणार्‍यांचा दोष असतो. अगदी त्याप्रमाणे शिक्षण हा मुलभूत संकल्पनेचा दोष नाही. ते शिक्षण आपण कशासाठी वापरतो घेतलेल्या शिक्षणाचा काय? आणि कोणासाठी वापर करतो त्याला महत्त्व आहे. शिक्षणाचे असेही महत्म्य सत्यम शिवम् सुंदरम् हे त्रिकाळबाधीत तत्त्वांची जोपासणा आणि उपासना करणे सुरू होते.
 शिक्षणावर अनेक आरोप केले जातात. शिक्षणाचा बाजारी करण त्यातील जीवन मुल्यांची आणि जीवन दृष्टीची घसरण, शिकूण सावरून ही येणारी बेकारी  बकाळपण आणि भिकारपण... इत्यादी बरच काही  पण यात शिक्षणाचा काय दोष? वरील उदाहरणातील आग्नि आणि सुरीची भूमिका अथवा संकल्पना शिक्षणाची आहे. आम्ही सर्व मानव शिक्षणाचा वापर कशासाठी करतो, कशासाठी करतो यावर सर्व अवलंबून आहे. शिक्षणाबाबत बोटे मोडून अथवा शिक्षाणाला नावे ठेेवून काही सध्या होणार नाही. शिक्षणाचा काळ सुसंगत सद सद विवेकाने  वापर करण्यात शहाणपण आहे. त्यासाठी शिक्षणाला पोषक उपयुक्त ठरणार्‍या इतर घटकांचा आणि समस्याचाही विचार समाज धुरांणी आणि राजकर्त्यांनी करावयास हवा. त्यासाठी तंत्राची जणत्याची मदत आणि सहकार्य घ्यावसा हवे या जगात सर्व ज्ञानी एकमेव असा कोणी एक नसतो. बिनासहकार नाही उध्दार या सहयोगी तत्वात व्यापक अर्थाने शिक्षणाची संकल्पना रूजवण्यास आणि वाढविण्यास हावी. काळ, काम, वेग, यंत्र, तंत्र, मंत्र याचा विवेक वेग घ्यावयास हवा. याचाच अभाव असला तर “ शिक्षण हे ओझे वाटू लागेल, ते दुरूउपयोगी ठरले पण याउलट काळ सुसंगत सरणी ठेऊन तसाच अचार विचार आणि वर्तन व्यवहार ठेवला तर शिक्षण हा जगण्याती प्राण वायू ठरील. शिक्षणाचे महत्म्य पूर्वी सुरीनी जाणले होतो. म्हणूनच त्यांनी मराठा विद्याप्रसारक संस्था स्थापन केली. याच उद्दीष्टाने प्रेरित होऊन रयत शिक्षण संस्था निर्माण झाली. शिक्षणाचे महात्म्य थोर उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेऊन महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर भारत  देशात आणि जगात सुध्दा अनेक संस्था कार्यरत झाल्या आहेत. कमी अधिक प्रमाणत सर्वांच महत्त्व होत आहे. अतिमत काय तर शिक्षण हे  केंद्रीत असावे. अशी व्यक्तीकेंद्रीत व्यक्ती समाज उद्धाक, समाज प्रेरक असावे. शिक्षण झोपलेल्या अज्ञात निदरिस्त झालेल्यास जागे करते. जागे झाल्यास उठवून बसविते. बसलेल्यास उभे करते. उभे असलेल्यास चालण्याची प्रेरणार  देते. चालणार्‍यास पाळण्याचे आयुष्य शर्यत जिंकण्याचे सामर्थ देते इतके शिक्षणाचे सामर्थ आणि महात्म्य आहे. शिक्षणाचे सामर्थ्य आणि महत्म्य लक्षात घेऊन सध्या स्थितीत, शिक्षणाचा काळ सुसंगत उपयोग करून घेणे हे सर्वस्वी आपणा सर्वांवर अवलंबून आहे.

                                                                                                                                     डॉ. यशवंतराव पाटील
                                                                                                                  यशवंत क्लासेस, गजानन इनक्लेव्ह,

                                                                                  अशोक स्तंभ, गंगापूर रोड, नाशिक -01, मो. 9890615649

मागे

जीवनाचे अध्यात्म
जीवनाचे अध्यात्म

आजच्या 21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या काळात काळ - काम- वेग यांच्याशी नि....

अधिक वाचा

पुढे  

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्ये
धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्ये

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. क....

Read more