ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जीवनाचे अध्यात्म

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 08:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जीवनाचे अध्यात्म

शहर : मुंबई

आजच्या 21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या काळात काळ - काम- वेग यांच्याशी निगडीत असलेल्या जीवनशैली अनेक बाबतीतील सीमारेषा अस्पष्ट होत आहेत. आता आपण सर्व जण एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येत आहत. ही बाब निश्चितच चांगलली आहे. सर्वच धर्म, पंथ, संप्रदायोन अद्वैत तत्त्वज्ञान प्रतिपादन केलं आहे. भेदाभेद भ्रम अमंगल असे म्हटले आहे. एकात्मकतेचा पुरस्कार केला आहे. हे विश्वची माझे घर असा व्यापक आशय आणि अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे. अशाच अर्थाच्या आणि आशयाच्या रचना अनेक साधु- संत, तत्त्ववेत्त्यानी प्रतिपादन केल्या आहेत. याचंच आकलन आणि आचरण यालाच जीवनाचं अध्यात्म म्हटल्यास वावंगं ठरू नये सद्यस्थितीत याच अध्यात्माची आवश्यकता आहे.
अशा स्वरूपाच्या आध्यत्मिक जीवनात काही उदात्त जीवनमूल्ये असतात. पाप आणि पुण्याच्या संकल्पना सोप्या आणि सुस्पष्ट असतात. उदा पुण्य ते परोपकर। पाप ते परपीड॥। पाप पुण्याची ही संकल्पना संत तुकाराम महाराजांनी सहज चार शतकां पूर्वी मांडल. करितो परोपकार। त्याच्या पुण्या नाही पार॥1॥ करितो परपीडा। त्याच्या पापा नाही जोडा॥2॥ संत सेना महाराजांनी ही रचना सुध्दा संत तुकारामाच्या अभंगाचाच व्यापक  आशय आणि अर्थ व्यक्त करते. थोडक्यात म्हणजे आध्यात्मिक जीवन म्हणजे काही फार आगळे-वेगळे असते असे मुळीच नाही. पण आपण आपल्या पोथी पुराणवरील अति निष्ठेने आणि कालबाह्य कर्मकांडाने ते अधिक गुंतागुंतीचे अनाकलनीय आणि रुढीबध्द करून ठेवले आहे. आपल्यातील बरेच वर्तमान काळात, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगतात, पण त्यांची मानसिकता आणि बर्‍याचशा कृती भूतकाळातल्या असतात. हे सर्व सदसदविवेकाने  टाळावयास हवे. जमेल झेपेल तेवढा परोपकार करावा म्हणजे इतरांना मदत करीत राहवी. हवे जमेल झेपेल तेवढा परोपकर करावा म्हणजे इतरांना मदत करीत राहवी. इतरांसाठी काही करता येणे शक्य झाले नाही तर निदान इतरांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास, मानसिक यातना, पीडा देऊ नये.
अध्यात्म, धार्मिक आचरण याबाबत फार बोजड, अवघड, अनाकलनीय असे काही नाही. पण आपण कोणतीही गोष्ट तत्त्व, विचारउपदेश आदी सरळ मार्गाने समजून घेत नाही. त्यात अधिकाधिक क्लिष्टता, गुुंतागुंत निर्माण करतो. साधे-सोपे-सरळ आध्यात्मिक वा धार्मिक जीवन अवघड, दुबोंध करून टाकतो हे सर्व टाळावयास हवे. 
क्रमशः

मागे

...आणि अंगात वीज सळसळली !
...आणि अंगात वीज सळसळली !

2011 चे ते वर्ष ! काहीजण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझ्यासारख्या कडवट शिवसै....

अधिक वाचा

पुढे  

शिक्षणाचे महात्म्य
शिक्षणाचे महात्म्य

शिक्षण हे सर्व सुधारणांचे प्रवेशद्वार आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आ....

Read more