ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कंगनाला पुरवण्यात आलेल्या 'Y' दर्जाच्या सुरक्षेसाठी 'इतक्या' रूपयांचा खर्च

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कंगनाला पुरवण्यात आलेल्या 'Y' दर्जाच्या सुरक्षेसाठी 'इतक्या' रूपयांचा खर्च

शहर : मुंबई

बॉलिवूडमधील कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी आभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगनामध्ये चांगलाचं  वाद रंगला होता. या वादानंतर जेव्हा कंगना मुंबईत आली तेव्हा तिला केंद्र सरकारकडून 'व्हाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली. त्यासाठी कंगनाने केंद्र सरकारचे आभार देखील मानले होते. आता यासर्व घटनांनंतर कंगनाला देण्यात आलेल्या सुरक्षेवर किती रूपयांचा खर्च आला असा प्रश्न विचारला जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवर किती रूपयांचा खर्च झाला याचं उत्तर देणं अशक्य आहे. अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. माहितीच्या अधिकाराखाली जम्मू येथील रहिवासी रोहित चौधरी यांच्या अर्जाचं उत्तर दिली आहे.

 'कंगना किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेल्या सुरक्षाचे खर्च आणि त्याचा हिशोब गृहमंत्रालय ठेवत नाही. त्यामुळे नक्की किती खर्च झाला सांगणं कठीण आहे, वाहतूक, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा खर्च, वाहने इत्यादींवर केला जाणारा खर्च यांचा समावेश असतो आणि हा खर्च संबंधित सुरक्षा संस्था आणि बजेट प्रमुखांकडून दिला जातो.' असं उत्तर गृहमंत्रालयाने दिलं आहे.

कंगनाला 2020मध्ये 'व्हाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. दरम्यान कंगना नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. समाजातील अनेक मुद्द्यांवर ती मत मांडत कायम वादाच्या भोवऱ्यात राहते.

मागे

पेट्रोल दर वाढीवर बॉलिवूडकर गप्प का? नाना पटोलेंचा सवाल
पेट्रोल दर वाढीवर बॉलिवूडकर गप्प का? नाना पटोलेंचा सवाल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी महानायक अमिताभ बच्च....

अधिक वाचा

पुढे  

Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती
Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती

गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या 14 व्या मोसमाचा महाअंतिम स....

Read more