ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चक्क! व्हेल माश्याने परत आणून दिला मोबाईल फोन

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चक्क! व्हेल माश्याने परत आणून दिला मोबाईल फोन

शहर : मुंबई

नॉर्वेमधील हॅमरफेस्ट बेटसमुहांजवळ हा सर्व प्रसंग घडला. लॅडबीबल ग्रुप या युनायटेड किंग्डममधील समाजसेवी संस्थेच्या मालकिचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बेलुगा प्रजातीमधील हा व्हेल मासा पांढर्‍या रंगाचा असतो. एका शक्यतेनुसार रशियन नौदलाकडून व्हेल माश्यांना हेरगिरीसाठी प्रशिक्षण दिले जाते. त्याच व्हेल माश्यांपैकी हा एक मासा असल्यानेच त्याने हा मोबाइल परत आणून दिल्याचा दावा केला जात आहे. हॅमरफेस्ट येथील इना मानसिका आणि तिच्या मैत्रिणी याच व्हेल माश्याला पाहण्यासाठी बोटीमधून समुद्रात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना केवळ हा मासा दिसलाच नाही तर त्याने आपल्या दिलदारपणाही त्यांना दाखवला.


द डोडो या वेबसाईटला इनाने दिलेल्या माहितीनुसार व्हेल पाहण्यासाठी ती आणि तिच्या मैत्रिणी बोटून समुद्रात गेल्या. त्यावेळी समुद्रात त्यांना तो व्हेल मासा दिसला. त्याला हात लावण्याच्या नादात इनाचा मोबाइल पाण्यात पडला. ‘मी माझ्या जॅकेटच्या खिशाची चैन लावायला विसल्याने माझा फोन समुद्राच्या पाण्यात पडला. मला तो फोन आता कायमचा गेला असं वाटलं. पण तितक्यात त्या व्हेलने पाण्यात डुबकी मारली. त्यानंतर काही क्षणांमध्ये तोंडात फोन घेऊन तो मासा पुन्हा बोटीजवळ आला आणि आम्ही तो फोन त्याच्या तोंडातून काढून स्वत:च्या ताब्यात घेतला,’ असं इनाने सांगितले.

मागे

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहूल गांधी यांची भेट 
चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहूल गांधी यांची भेट 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्ली....

अधिक वाचा

पुढे  

सतारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत 
सतारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत 

मे महिन्यामध्ये कास तलावाचा आटलेला विसर्ग यामुळे सातारा शहरात पाणीबाणी नि....

Read more