ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग

शहर : मुंबई

केंद्र आणि राज्यसरकारी कर्मचारी तसेच मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यानी 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन वाढ लागू झाली आहे. मात्र महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील माध्यमिक शाळांमधील 1 हजार 450 शिक्षक 7व्या आयोगापासून वंचित होते. आता या शिक्षकांना पुढील महिन्यापासून म्हणजेच ओक्टोबर पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना ओक्टोबरच्या पगारापासून 7 वा वेतन आयोग तसेच थकबाकी देण्याचे निर्देशही शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

पालिका कर्मचार्‍यांना लागू करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधा पालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि कर्मचार्‍यांना देण्यात येतात. परंतु माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यासाठी पालिकेच्या कर्मचारी विभागाणे नकारात्मक अहवाल दिल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. तर या शिक्षकांनाही 7 वा वेतन आयोग त्वरित लागू करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत लावून धरली.

यावर माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना त्वरित 7 वा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी शिक्षण विभागाला दिले.

मागे

कर्मचार्‍यांच्या संपामुळे 4 दिवस बँका बंद राहणार
कर्मचार्‍यांच्या संपामुळे 4 दिवस बँका बंद राहणार

या महिन्याअखेरीस दि. 26 व 27 सप्टेंबरला बँक कर्मचार्‍यांच्या चार संघटनांनी स....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना हिंदी राजभाषा पुरस्कार
महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना हिंदी राजभाषा पुरस्कार

 दैनंदिन व्यवहारात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रभावी वापर केल्याबद्दल महाराष....

Read more