ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना हिंदी राजभाषा पुरस्कार

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 07:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना हिंदी राजभाषा पुरस्कार

शहर : delhi

 दैनंदिन व्यवहारात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रभावी वापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते  हिंदी राजभाषा पुरस्काराने गौरविण्यात आले.

 केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्यावतीने येथील विज्ञान भवनात हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून  2018-19 या वर्षातील राजभाषा किर्ती पुरस्कार तथा राजभाषा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंदीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि जी. किशन रेड्डी तसेच राजभाषा विभागाच्या सचिव अनुराधा मित्रा मंच्यावर उपस्थित होत्या.

 या कार्यक्रमात केंद्रीय मंत्रालयकेंद्र शासनाचे सार्वजनिक उपक्रमकेंद्र शासनाची विविध मंडळराष्ट्रीयकृत बँकानगर राजभाषा कार्यान्वयन समिती तसेच केंद्र सरकारचे अधिकरी-कर्मचारी यांना हिंदी भाषेतील उल्लेखनीय योगदानासाठी एकूण 43 पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र शासनाचे महाराष्ट्रातील 3 सार्वजनिक उपक्रम2 मंडळ2 नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या आणि 1 राष्ट्रीयकृत बँक अशा एकूण   8 संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

 तीन सार्वजनिक उपक्रमांचा सन्मान

देशातील सार्वजनिक उपक्रमांना ३ श्रेणीमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले.  श्रेणीत तीनही पुरस्कार महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रमांना प्रदान करण्यात आले. क्रमश: मुंबई येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेशकुमार सुराणा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पुरस्कार स्वीकारला. भारतीय निर्यात कर्ज हमी महामंडळ लिमिटेड (ईसीजीसी) ला तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गीता मुरलीधर यांनी पुरस्कार स्वीकारला.

  दोन मंडळांचा गौरव

यावेळी तीन श्रेणीमध्ये केंद्र शासनाच्या एकूण ९ मंडळांना सन्मानित करण्यात आले. यात मुंबई येथील भाखडा ब्यास प्रबंध बोर्डला  श्रेणी मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष देवेंद्रकुमार शर्मा यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत मुंबई येथील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रीकी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे आफताब आलम यांनी पुरस्कार स्वीकारला.

 बँक ऑफ महाराष्ट्र चा सन्मान

देशातील एकूण सहा राष्ट्रीयकृत बँकांना यावेळी तीन श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रला  श्रेणीमधील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यपालन अधिकारी ए.एस.राजीव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 दोन नगर राजभाषा कार्यान्वयन समित्यांचा गौरव 

या कार्यक्रमात तीन श्रेणीमध्ये देशातील एकूण सहा नगर राजभाषा कार्यान्वयन समित्यांचा गौरव करण्यात आला.  श्रेणीत महाराष्ट्रातील दोन समित्यांना अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई येथील नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि समितीचे सदस्य सचिव दीपक त्रिपाठी यांनी पुरस्कार स्वीकारला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार रत्नागिरी येथील नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक अतुल सातपुते तसेच समितीचे सदस्य सचिव तथा राजभाषा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक रमेश गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ई-सरल हिंदी वाक्य कोष आणि ई-महाशब्द कोष या मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच हिंदी भाषेचे महत्व विषद करणारा भारत की आवाज हिंदी हा लघुपट दाखविण्यात आला.   

 

मागे

पालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग
पालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग

केंद्र आणि राज्यसरकारी कर्मचारी तसेच मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आण....

अधिक वाचा

पुढे  

 राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली -  देवेंद्र फडणवीस
 राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली -  देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्....

Read more