ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जमशेदपूरमध्ये एका भामट्याला बेदम मारहाण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 02:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जमशेदपूरमध्ये एका भामट्याला बेदम मारहाण

शहर : jamshedpur

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी म्हणवणार्‍या एका तरुणाची महिलेने जाम धुलाई केली. या महिलेने मारण्याच्या आधी तिच्या एका नातेवाईकाने या भामट्याची धुलाई केली. त्याने या भामट्याला कुस्तीत वापरतात तसा धोबीपछाड देत नकली अधिकार्‍याची हाडं खिळखिळी केली. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार या महिलेकडे हा भामटा 50 हजार रूपये मागत होता. तिच्या घरी कौटुंबिक अडचणी होता, त्यातून सुटका करून देतो असं सांगत त्याने हे पैसे मागितले होते.

महिलेला संशय आल्याने तिने या बहुरुप्याला मांगो भागातील एका ठिकाणी बोलावलं. तिथे हा येताच त्याला चपलेने मारायला सुरुवात केली. तिचं मारून झाल्यानंतर तिच्या नातेवाईकानेही या भामट्याला चोपला. तेवढ्या पोलीस आल्याने या भामट्याची सुटका झाली. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याचं नाव फणींद्र माहतो असल्याचं कळालं आहे. त्याच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं बनावटी आयकार्ड देखील सापडलं आहे.

मागे

सतारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत 
सतारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत 

मे महिन्यामध्ये कास तलावाचा आटलेला विसर्ग यामुळे सातारा शहरात पाणीबाणी नि....

अधिक वाचा

पुढे  

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन
जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन

जेट एअरवेजच्या 22 हजार कर्मचार्‍यांवर ‘बंद’ मुळे बेकारी आल्याने कर्मचा....

Read more