ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आरे कॉलनी'त उभी राहणार 'नाईट झू सफारी'

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'आरे कॉलनी'त उभी राहणार 'नाईट झू सफारी'

शहर : मुंबई

आरे कॉलनीतल्या सुमारे १२० एकर क्षेत्रावर आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आरे कॉलनीतील हे प्राणी संग्रहालय हे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचा विस्‍तारित भाग राहील. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर मान्यवर उपस्थित असतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेस ९९ वर्षांच्‍या कालावधीकरिता रुपये १/- प्रमाणे भाडेतत्वावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय विकसित करण्याकरिता जमीन हस्तांतरित केली जातेय.

राज्य सरकारचा वन विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी संग्रहालयासाठी लागणारी जमीन मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करीत आहे. यासाठीचा सामंजस्य करार होत आहे. जागा हस्‍तांतरित केल्‍यापासून सुमारे ४ ते ५ वर्षांच्‍या कालावधीमध्‍ये सदर प्राणी संग्रहालयाचा प्रत्‍यक्ष विकास करण्‍यात येणार आहे.

सिंगापूर येथील प्रसिद्ध नाईट सफारीच्‍या संकल्‍पनेवर आधारीत 'नाईट झू-सफारी' या प्राणी संग्रहालयात विकसित करण्‍यात येणार आहे. प्राणी संग्रहालयाच्या उभारणीपासून पुढील व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेची राहील. प्राणी संग्रहालयापासून उत्पन्न होणारा निव्वळ महसूल महानगरपालिका आणि वनविभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात ८०:२० समभागात विभागला जाईल. 

मागे

नवी मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, पुलाच्या भिंतीवर आढळला संशयास्पद मजकूर
नवी मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, पुलाच्या भिंतीवर आढळला संशयास्पद मजकूर

नवी मुंबईतील उरण जवळील मोठमोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्या....

अधिक वाचा

पुढे  

लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ
लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ

लोकमान्य टिकळ टर्मिनस हे मुंबईतील प्रवाशांनी नेहमी भरलेलं स्थानक आहे. मह....

Read more