ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवी मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, पुलाच्या भिंतीवर आढळला संशयास्पद मजकूर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 04, 2019 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवी मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, पुलाच्या भिंतीवर आढळला संशयास्पद मजकूर

शहर : navi Mumbai

नवी मुंबईतील उरण जवळील मोठमोठे प्रकल्प दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघडकीस आले आहे. उरण जवळील खोपटा पुलावर त्यासंबंधित मजकूर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मजकुरामध्ये इसिस, दहशतवादी अबू बकर अल बगदादी, हाफिज सईद, रहीम कटोरी आणि राम कटोरी यांचा उल्लेख आहे.

काही संशयास्पद नावांशिवाय धोनी, केजरीवाल यांची नावेही यात सांकेतिक स्वरूपात वापरण्यात आली आहेत. तसेच जेएनपीटी, एअरपोर्ट आणि गॅस पेट्रोलच्या प्रकल्पाचे नकाशे काढून त्यावर मजकूर लिहिला आहे. तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हे दहशतवादी मजकूर लिहिले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, हा मजकूर निदर्शनास आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पुलाच्या पिलरवर दहशतवादी संदेश लिहिणाऱ्याचा कसून शोध सुरू आहे.

मच्छीमारांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कंटेनरची ये-जा सुरु असते. जेएनपीटीकडे जाणाऱ्या या वाटेवर सुरु असणाऱी वाहनांची वरदळ आणि एकंदर या आकृत्यांमध्ये आढळलेला मजकूर पाहता नजीकच्याच काही ठिकाणांचा त्यात उल्लेख आहे. त्यामुळेच संरक्षण यंत्रणा अधिकाधिक सतर्क असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या तपासामध्ये नेमकी कोणती माहिती हाती लागते, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.

 

मागे

आरबीआयचा निर्णय,नव्या बँकांना परवाना देणं बंद
आरबीआयचा निर्णय,नव्या बँकांना परवाना देणं बंद

रिझर्व्ह बँकेनं मौद्रिक धोरण जाहीर करण्यापूर्वीच एक मोठा निर्णय घेतल्याच....

अधिक वाचा

पुढे  

'आरे कॉलनी'त उभी राहणार 'नाईट झू सफारी'
'आरे कॉलनी'त उभी राहणार 'नाईट झू सफारी'

आरे कॉलनीतल्या सुमारे १२० एकर क्षेत्रावर आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे प्राणी स....

Read more