ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

आंध्रमध्ये एकाचवेळी पाच उपमुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा निर्णय

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 07, 2019 02:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंध्रमध्ये एकाचवेळी पाच उपमुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा निर्णय

शहर : अमरावती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाच उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारूण पराभव केला होता. जगमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली. देशात पहिल्यांदाच एखाद्या मंत्रिमंडळात पाच मुख्यमंत्री असणार आहेत. याआधी चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री होते.

अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं जगमोहन रेड्डी यांनी सांगितलं आहे. निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारूण पराभव केला. लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागांवर आणि विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर वायएसआर काँग्रेसचा विजय झाला.  जगनमोहन सरकारचा शपथविधी शनिवारी होणार असून त्यांच्यासह २५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

मागे

अटलबिहारी वाजपेयींचा बंगला अमित शाह यांना
अटलबिहारी वाजपेयींचा बंगला अमित शाह यांना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेय....

अधिक वाचा

पुढे  

मालेगाव बॉम्बस्फोट साध्वी प्रज्ञासिंहांचं कोर्टाला उत्तर :“मला माहिती नाही”
मालेगाव बॉम्बस्फोट साध्वी प्रज्ञासिंहांचं कोर्टाला उत्तर :“मला माहिती नाही”

  मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळची  खासदार साध्वी प्रज्ञासिं....

Read more