ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या खटल्यात हाय व्होल्टेज ड्रामा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 02:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या खटल्यात हाय व्होल्टेज ड्रामा

शहर : मुंबई

रामजन्मभूमी खटल्यात अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असताना मुस्लिम पक्षकाराचे वकिल राजीव धवन यांनी हाय व्होल्टेज ड्रामा केला. हिंदू पक्षाचे वकील विकास सिंह यांनी काही नकाशे न्यायालयासमोर ठेवले. तसंच वादग्रस्त जमिनीवर मंदिर असल्याचा सिद्ध करण्यासाठी आयपीएस किशोर कुणाल यांच्या अयोध्या रिव्हिजिटेड या पुस्ताकाचा हवाला दिला, मात्र हा दावा राजीव धवन यांनी फेटाळून लावला.त्यानंतर विकास सिंह यांनी त्यांच्यासमोर नकाशा ठेवला असता धवन यांनी तो फाडून टाकला. त्यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशीच परिस्थिती राहिली तर आता सुनावणी संपल्याचं जाहीर करून लेखी स्वरूपात युक्तीवाद घेणार असल्याची तंबी दिली.

त्याआधी या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला आहे. त्यामुळे  सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे.

दरम्यान या खटल्याची रोज सुरू असलेली सुनावणी आजच ५ वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयात एका वकिलाने आणखी वेळ मागितला असताना न्यायालयाने इनफ इज इनफ असं सुनावलं.

मागे

उपासमारीत ११७ देशांमध्ये भारत १०२ व्या क्रमांकावर - सर्वे
उपासमारीत ११७ देशांमध्ये भारत १०२ व्या क्रमांकावर - सर्वे

भारताबाबतचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  ग्लोबल हंगर इंडेक्सद्वारा (GH....

अधिक वाचा

पुढे  

ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांना कधीच मी विसरू शकत नाही- धनंजय मुंडे
ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांना कधीच मी विसरू शकत नाही- धनंजय मुंडे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-तालुक्यातील उजनी पाटी येथे झालेल्या रेर्कार्डबे्रक....

Read more