ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांना कधीच मी विसरू शकत नाही- धनंजय मुंडे

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 08:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांना कधीच मी विसरू शकत नाही- धनंजय मुंडे

शहर : मुंबई

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-तालुक्यातील उजनी पाटी येथे झालेल्या रेर्कार्डबे्रक सभेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले उजनी, 12 वाड्या व पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. जीवनात कितीही मोठा झालो त्याची मी परतफेड करू शकत नाही. ज्यांच्यामुळे माझा राजकीय जन्म झाला, ज्यांनी मला घडवलं त्या जनता जनार्धनाचे कुठल्या शब्दाने उपकार व्यक्त करू? त्यासाठी शब्दही कमी वाटतात. एक मात्र नक्की आहे, ज्यांनी मला घडवलं त्यांना मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. 

उजनी पाटीच्या ऐतिहासिक मैदानावर धनंजय मुंडे यांची बुधवारी रात्री जाहिर सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर मुरकूटे, प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य संजय दौंड, राजवर्धन दौंड, सभापती सौ.मिनाताई भताने, कृ.उ.बा.समितीचे संचालक सत्यजित सिरसाट, काशिनाथ कातकडे, बबनराव मुंडे, अनंत केंद्रे, चंद्रकांत चाटे, बाबुराव जाधव, चंद्रकांत गायकवाड आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमचा चेहरा पाहिला की, येत्या 24 ऑक्टोबरला काय निकाल येणार आहे, हे कोणत्याच भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही. गेल्यावेळी माझा पराभव झाला, पण मी खचलो नाही. माझ्या माणसांशी नाते कधीही तुटू दिले नाही. आजही मी महाराष्ट्रातल्या, मतदारसंघातल्या माणसांसाठी 20-20 तास काम करत आहे. ही निवडणूक मी माझ्या मातीतल्या माणसांसाठी एक स्वप्न पाहिले आहे, ते विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लढवत आहे. मी माझ्या राजकीय जीवनात विरोधक संपवण्यासाठी कधीच काम केले नाही, पण माझ्यासाठी मात्र धनंजय मुंडे राजकारणातून संपला पाहिजे भाजपाची त्यांची सगळी फौज कामाला लावली आहे. स्वभाविक आहे मला वाटले परळी विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल, पण या मतदारसंघावर दिल्लीचेही लक्ष आहे, याचे मला नवल वाटते. माणूस सर्वसामान्याचे काम केल्याने मोठा होतो आणि गेली 24 वर्ष मी आपले काम करत आहे, म्हणून दिल्लीला त्याची दखल घ्यावी लागली, असा टोलाही यावेळी धनंजय मुंडेंनी लगावला.

यावेळी भाजपातून अनेक जणांनी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यामध्ये सोमनाथ मुरकूटे, महादेव मुरकूटे, कोंडीबा मुरकूटे, मुन्ना मुरकूटे, संतोष भताने, भरत भताने, उदयसिंह कवडे, अभय कवडे, अंकुश कवडे, स्वप्निल कवडे, विक्रम कवडे, पवन कवडे, शुभम कवडे, अक्षय कवडे, तुकाराम कवडे, राज कवडे, प्रशांत कवडे, सद्दाम शेख, अमीर शेख, दयानंद गिरी, राहुल गायकवाड, अनंत माने आदींनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यावेळी राजाभाऊ मुरकूटे, बळीराम मुरकूटे, बापु मुरकूटे, अच्युत इंगळे, वसंत दराडे, सिताराम हाडबे, महादेव कातकडे, सज्जन दराडे, दिगांबर केंद्रे, नामदेव कातकडे, रतनहरी कांगणे, रखमाजी कांगणे, वालचंद फड, श्रीराम कांगणे, संभाजी फड, मारोती फड, विश्वनाथ फड, गंगाधर घुले, अशोक चाटे, धर्मराज चाटे, लक्ष्मण भताने, बबन सोनवणे, संतोष दराडे, संभाजी भताने, बालासाहेब भताने, कैलास गायकवाड, ज्ञानराज गायकवाड, दिलीप गायकवाड, दिनकर कवडे, बापुसाहेब गायकवाड, लिंबराज लहाने, धनराज सोळंके, भगवान फड, महेबुब शेख, धोंडीराम फड, अंकुश सोनहिवरे, बालाजी सोनहिवरे, बाबु कांदे, फुलचंदअण्णा कातकडे, रामप्रसाद डापकर, व्यंकटी मुंडे आदींसह उजनी पंचायत समिती गणातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागे

अयोध्या खटल्यात हाय व्होल्टेज ड्रामा
अयोध्या खटल्यात हाय व्होल्टेज ड्रामा

रामजन्मभूमी खटल्यात अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्वोच्....

अधिक वाचा

पुढे  

मतदानाच्या दिवशी राज्यात वादळी पावसाचा अंदाज
मतदानाच्या दिवशी राज्यात वादळी पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुण....

Read more