ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या निकाल: पाहा काय आहे 'हिंदू' आणि 'मुस्लीम' पक्षकारांचा दावा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 10:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या निकाल: पाहा काय आहे 'हिंदू' आणि 'मुस्लीम' पक्षकारांचा दावा

शहर : मुंबई

अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत आज निकाल येणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्ट या खटल्यावर ऐतिहासिक निर्णय देणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जागोजागी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा वाद सुरु आहे. पण आता या वादाला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. या वादात दोन्ही बाजुच्या लोकांचं काय म्हणणं आहे. जाणून घेवूया...

 

हिंदू पक्षकार

श्रीराम यांचा जन्म अयोध्येत झाला.

श्रीराम देशाचे सांस्कृतिक पुरुष आहेत.

रामाची जन्मभूमी त्याच ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मशीदीचं मुख्य घुमट आहे.

विष्णुंचा सातवा अवतार असलेल्या रामांचं मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली.

मंदिरात पूजा आणि उत्सव पुरातण कालापासून सुरु आहेत. हे फाहयान आणि त्या नंतर आलेल्या विदेशी पर्यटकांच्या डायरी आणि आलेख यातून स्पष्ट होतं.

पद्म पुराण आणि स्कंद पुराण यामध्ये ही रामजन्मस्थानाची माहिती आहे.

1528 मध्ये बाबरने सेनापती मीर बाकीने मंदिर तोडून मशीद बनवली.

एएसआय म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने केलेल्या खोदकामात देखील खाली मंदिर असल्याचं प्रमाण मिळालं आहे.

खोदकामात खांबांवर देवी देवता, हिंदू धर्माचं प्रतीक असलेलं नक्षी काम आढळलं आहे.

1885 मध्ये फैजाबादचे तत्कालीन जिल्हा न्यायाधीशांनी देखील 1528 मध्ये हिंदू धर्मस्थळ तोडून त्या ठिकाणी मशीद बांधल्याचं मान्य केलं होतं.

या घटनेला साडेतीनशे वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता यात बदल करण्यात कायदा व्यवस्थेची समस्या होऊ शकते.

 

मुस्लीम पक्षकार

रामाची ऐतिहासिकता आणि अयोध्येत त्यांच्या जन्माबाबत कोणताही वाद नाही. पण मशीदीच्या मुख्य घुमट खालीच त्यांचं जन्मस्थान आहे. हा दाव्याला आधार नाही.

हिंदू धर्मग्रंथात अवधपुरीमध्ये रामाचा जन्म झाला असं म्हटलंय पण त्यात जागेची माहिती नाही होत.

बाबरने 1528 मध्ये जेथे मशीद बनवली ती जागा रिकामी होती. त्या ठिकाणी कोणतंही मंदिर नव्हतं.

जागेची मालकी मुघल काळापासून कागदपत्रानुसार, गावातील मशीदीसाठी होती.

एएसआयने केलेलं खोदकामामध्ये मिळालेली भिंत मंदिर नाही तर ईदगाहची असू शकते.

खोदकामात मिळालेल्या मूर्त्या खेळण्या देखील असू शकतात.

दगडांवर असलेलं नक्षीकाम स्पष्ट नाही. ते खांब त्या ठिकाणीच होतं की तेथे आणले गेले याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे तेथे हिंदू मंदिर होतं असं म्हणता येणार नाही.

मुख्य घुमटच्या ठिकाणी 22-23 डिसेंबर 1949 च्या रात्री रामलला प्रकट झाल्याच्या माहितही तथ्य नाही.

गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री निर्मोही अखाड्याचे साधु जबरदस्ती मशीदमध्ये गेले आणि तेथे मूर्ती ठेवल्या.

या जागेचा मालकी सुरुवातीपासून मुस्लीमांची आहे. हिंदूंना फक्त राम चौथऱ्यावर पूजा करण्याची अनुमती होती.

मागे

अयोध्या निकाल : मुंबईत कडकोट बंदोबस्त
अयोध्या निकाल : मुंबईत कडकोट बंदोबस्त

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निकाल देण....

अधिक वाचा

पुढे  

#AyodhyaVerdict : एक नजर आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर ....
#AyodhyaVerdict : एक नजर आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर ....

अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणीच्या खटल्याचा बहुप्रतिक्षित न....

Read more