ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या निकाल : मुंबईत कडकोट बंदोबस्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 10:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या निकाल : मुंबईत कडकोट बंदोबस्त

शहर : मुंबई

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निकाल देणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईतही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर आहे. संशयितांची कसून चौकशी करण्यात येते आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे. रेल्वे स्थानकांवर देखील पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबईतील अतिसंवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

राज्याचे कळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकालाच्या दृष्टीने शांततेचं आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा. राज्यात शांतता आणि सलोखा कायम राखण्यात मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आधीच राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते. सर्व राज्यांना याबाबत एक पत्र पाठवण्यात आलं होतं. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. संशयितांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या सायबर सेलनेही फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये निकालापूर्वी तसंच निकालानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली जाणारी प्रक्षोभक भाषणं, माहिती आणि व्हीडिओंवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

मागे

अयोध्या निकाल Live,सुप्रीम कोर्ट,परिसर,कडेकोट पोलीस बंदोबस्त,#AYODHYAVERDICT,#Ayodhya,#AyodhyaHearin
अयोध्या निकाल Live,सुप्रीम कोर्ट,परिसर,कडेकोट पोलीस बंदोबस्त,#AYODHYAVERDICT,#Ayodhya,#AyodhyaHearin

अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात ....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या निकाल: पाहा काय आहे 'हिंदू' आणि 'मुस्लीम' पक्षकारांचा दावा
अयोध्या निकाल: पाहा काय आहे 'हिंदू' आणि 'मुस्लीम' पक्षकारांचा दावा

अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत आज निकाल येणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुप....

Read more