ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या निकाल Live,सुप्रीम कोर्ट,परिसर,कडेकोट पोलीस बंदोबस्त,#AYODHYAVERDICT,#Ayodhya,#AyodhyaHearin

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या निकाल Live,सुप्रीम कोर्ट,परिसर,कडेकोट पोलीस बंदोबस्त,#AYODHYAVERDICT,#Ayodhya,#AyodhyaHearin

शहर : देश

अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल येणार असून संपूर्ण सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

10.20 - सरन्यायाधीश रंजन गोगाई कोर्टात पोहोचले.

 

9.50 - अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे पाचही न्यायाधीश कोर्टात दाखल.

9.45 - सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या कोर्टाबाहेर वकिलांची गर्दी.

9.35 - अयोध्येच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टात वकील पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे देखील सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत.

9.15 - सकाळी 9.30 वाजता न्यायाधीश कोर्टात पोहोचतील. त्यानंतर चीफ जस्टिस रंजन गोगोई यांच्यासह इतर न्यायाधीश कोर्टात येतील. 10.30 वाजता पाचही न्यायाधीश 5 बंद पाकिटं फोडतील. ज्यामध्य़े अयोध्येचा निकाल असेल. त्यानंतर अयोध्येचा निकाल जाहीर केला जाईल.

9.00 - निर्मोही अखाड्याचे वकील तरुणजीत वर्मा यांनी म्हटलं की, '491 वर्षानंतर येणारा हा निर्णय भारताला जोडण्याचं काम करणार आहे. आजचा हा निकाल संपूर्ण वाद संपवणार आहे.'

 

8.00 - अयोध्या प्रकरणावर 30 सप्टेंबर 2010 ला इलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला होता. या प्रकरणात कोर्टाने 2.77 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्माही अखाडा आणि रामलला या तिघांमध्ये वाटली होती. हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर मोठी सुनावणी झाल्यानंतर आज यावर सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय देणार आहे.

मागे

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

माजी पोलिस महासंचालक व उत्तर प्रदेश राज्यपालांचे सल्लागार म्हणून आपल्या क....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या निकाल : मुंबईत कडकोट बंदोबस्त
अयोध्या निकाल : मुंबईत कडकोट बंदोबस्त

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निकाल देण....

Read more