ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण  

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण   

शहर : मुंबई

सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने आज मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र मंत्रालयाच्या इमारतीत असावेअशी मागणी होती. या मागणीबाबत शासन सकारात्मक होते. या अनुषंगाने तैलचित्र लावण्याबाबतचा पाठपुरावा सामाजिक न्याय विभागाने केला होता. यासाठी सामाजिक न्याय विभागाने निधीची तरतूद केली होती. हे तैलचित्र मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार आर.टी. कांबळे यांनी बनविले आहे.

या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकरविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडेकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंतविरोधी पक्षनेतेमंत्रीमंडळाचे सर्व सदस्यसर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतील असे डॉ. खाडे यांनी सांगितले.

 

मागे

गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात   60 लाख व्यक्तींना रोजगार   
गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात  60 लाख व्यक्तींना रोजगार  

राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आधार ....

अधिक वाचा

पुढे  

डोंगरीत घरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
डोंगरीत घरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी डोंगरी येथे इमारत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. आज सकाळी ....

Read more