ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार

शहर : delhi

         नवी दिल्ली : बँक कर्मचार्‍यांच्या वेतन सुधारणेच्या मुद्द्यासह कामाची वेळ निश्चित करणे, कौटुंबिक पेन्शन इत्यादी मागण्यांसाठी शुक्रवार दि.३१ जानेवारी आणि शनिवार दि.१ फेब्रुवारी असे दोन दिवस बँक कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. तर २ फेब्रुवारीला रविवारी आहे. त्यामुळे उद्यापासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या दरम्यान ऑनलाइन बँकिंग सेवा मात्र सुरळीत सुरू असतील, अशी माहिती 'ऑल इंडिया' बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन'चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी दिली आहे. 

       बँक कर्मचार्‍यांचा संप आणि जोडून आलेला रविवार यामुळे बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैशांचा खडखडाट दिसू शकतो. या संपाविषयी भारतीय स्टेट बँकेसहीत (एसबीआय) इतरही सार्वजनिक बँकांनी आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला आहे. मात्र खासगी बँकांवर या संपाचा परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे.      

मागे

भारतात कोरोना व्हायरसची बाधा: केरळमध्ये सापडला रुग्ण
भारतात कोरोना व्हायरसची बाधा: केरळमध्ये सापडला रुग्ण

        नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी नवीन रु....

अधिक वाचा

पुढे  

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळला
चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळला

       आंबोली : आंबोली घाटात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चालका....

Read more