ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात कोरोना व्हायरसची बाधा: केरळमध्ये सापडला रुग्ण

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 04:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात कोरोना व्हायरसची बाधा: केरळमध्ये सापडला रुग्ण

शहर : delhi

        नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी नवीन रुग्णालय स्थापण्यात येत आहे. सर्वाधिक नागरिकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्याची बातमी उघड झाली आहे. कोरोना व्हायरस हा जगभरात पसरत आहे. भारतात केरळ मधील एका तरुणाला बाधा झाली आहे. तसेच हा तरुण चीनच्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता.

           भारतात ज्या रुग्णांना कोरोना व्हायरसची बाधा झाली त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे १७० जणांचा बळी गेला आहे, तर तब्बल सात हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिल्लीच्या राममनोहर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाच्या तीन संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. 

           कोरोना व्हायरसच्या लागणमुळे जगभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील वुहान हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र झाले असून जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मागे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन 

          पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म....

अधिक वाचा

पुढे  

उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार
उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार

         नवी दिल्ली : बँक कर्मचार्‍यांच्या वेतन सुधारणेच्या मुद्द्यास....

Read more