ठळक बातम्या आयुर्वेदानुसार रुईच्या झाडाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेमंद, हा गं’भी’र आजारही कायमस्वरूपी दूर करतो !.    |     टायफाइड असल्यास, हे उपाय केल्यानं मुळातून टायफाईड जाणार.    |     कापराच्या तेलाचे जादुई फायदे.    |     आर्थिक स्थिती मजबूत होईल जर घरात वाहणार सकारात्मक ऊर्जा.    |     हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध.    |    

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCचा मोठा निर्णय, आता रेंटिंग १२ आठवड्यानंतर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 15, 2020 05:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCचा मोठा निर्णय, आता रेंटिंग १२ आठवड्यानंतर

शहर : मुंबई

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जाहीर केले जाणार नाही, असे  BARCने जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान, टीआरपी घोळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

टीआरपी घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक चॅनलला उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकच्या याचिकेवर सुनावणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायाधीश डी वाय चंद्रचूड, इंदू मल्होत्रा, इंदिरा बॅनर्जी यांनी ही सुनावणी करण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल'ने (BARC) टीआरपी रेटिंग सध्या करणार नसल्याचे स्पष्ट केले आहेटीव्ही  रेटिंग जाहीर करणारी BARC ही संस्था आहे. BARC कडून प्रत्येक आठवड्याला चॅनलचे  रेटिंग जाहीर केले जातात. मात्र, पुढचे १२ आठवडे  रेटिंग जारी करण्याचा निर्णय 'बार्क'ने घेतला आहे.दरम्यान, NBAने बार्कच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच, बार्कने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी एनबीएशी सल्लामसलत करावी, असा सल्लाही एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिला आहे.

 

 

मागे

राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू
राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू

एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (NCP leader Sanjay Shinde)यां....

अधिक वाचा

पुढे  

TRP घोटाळा : रिपब्लीक टीव्हीला दिलासा नाही, सर्वोच्च न्यायालय म्हणतंय..
TRP घोटाळा : रिपब्लीक टीव्हीला दिलासा नाही, सर्वोच्च न्यायालय म्हणतंय..

टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लीक टीव्हीला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळा....

Read more