ठळक बातम्या आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा.....    |     तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |    

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 30, 2020 07:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा

शहर : मुंबई

कोरोना प्रादुर्भाव आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर महापालिका आणि शासनातर्फे नागरिकांना सूचना करण्यात आल्यायत. यंदाचा गणेशोत्स अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलंय. तसेच गणेश मुर्ती, मंडप, मिरवणूक यात्रांवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना बृहन्मुंबई महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

कोविड-१९ या साथ रोगाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता तसेच मा. उच् न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि महानगरपालिकेचे या संबंधीचे धोरण लक्षात घेता, मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारावेतयावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

गणपतीची मूर्ती  सार्वजनिक मंडळांकरिता फूट घरगुती गणपती फूटांपेक्षा जास् उंची नसावीयावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावेमुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे घरी विसर्जन करता येणे शक् नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावेगणेशमुर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक् असल्यास या मुर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या गणेश विसर्जनाच्यावेळी करता येणे शक् आहेजेणेकरुन विसर्जनासाठी गर्दी करणे टाळून स्वतःचे कुटुंबियांचे कोविड-१९ या साथ रोगाच्या प्रादुर्भावापासून रक्षण करता येईल.

गणेशोत्सव २०२० साजरा करतेवेळी आरोग् विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना पसंती द्यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग् विषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्तदान शिबीरे इत्यादी आयोजित करण्यास प्राधान् द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरती, भजन, कीर्तन वा अन् धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच कोविड-१९ च्या अनुषंगाने लॉकडाऊन शिथिल करण्यासंबंधीच्या शासनाच्या प्रचलित आदेशातील (Mission Begin Again) तरतुदींचा भंग होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, तसेच ध्वनिप्रदुषणासंदर्भातील नियमांचे तरतुदींचे पालन करावे.

दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट समाज माध्यमे आदींद्वारे, उपलब् करुन देण्याबाबत जास्तीत-जास् व्यवस्था करावी.

गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप् व्यवस्था करण्यात यावीप्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरि अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्, सॅनीटायझर इत्यादी) पाळणे बंधनकारक राहीललॉकडाऊन संदर्भातील शासनाच्या (Mission Begin Again) प्रचलित आदेशामधील यासंबंधीच्या तरतुदी बंधनकारक असतील.

आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळेत आणि कमीत-कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पाडावेलहान मुले आणि वरिष् नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावेसंपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेऊन गर्दी करण्यास परवानगी असणार नाही.

विविध गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रि तलावांची निर्मिती करण्यात यावीतसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याबाबत मागणी आल्यास, काही जुजबी पडताळणी करुन त्यास त्वरित मान्यता द्यावी.

कोविड-१९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.*

गणेशोत्सव विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.*

जर विसर्जनाच्या तारखेच्या दिवशी घरगुती गणपती स्थित असलेली इमारत / चाळ जर ‘’सिल् इमारत(sealed building) मध्ये असेल तर त्यांना विसर्जनासाठी घरगुती गणेशमुर्ती बाहेर घेवून जाण्यास परवानगी असणार नाहीत्यांना सदर गणेशमुर्तीचे विसर्जन बादलीमध्ये किंवा ड्रममध्ये करणे बंधनकारक राहील.*

 

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना...

मंडळांद्वारे स्थापित करण्यात येणा-या मुर्तीची उंची फूट पेक्षा जास् असू नये.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मंडपाचे आकारमान कमीत-कमी ठेवावे.

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मुखपट्टयांचा (Masks) वापर सामाजिक अंतर (social distancing) संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

मंडपात एकावेळी पेक्षा जास् कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावीउपस्थित सर्व व्यक्तिंनी मास् लावणे बंधनकारक आहे सामाजिक अंतर ठेवणे याचे काटेकोरपणे पालन होते आहे हे पाहण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिका-यांची राहील.

मंडपाच्या मुख् भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण (Sanitisation) करावे, तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी Sanitizers उपलब् करुन द्यावे.

भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक, समाज माध्यमें इत्यादीद्वारे सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे / फूले हार अर्पण करणे इत्यादी बाबींस आळा घालावा.

 

मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले, हार, प्रसाद इत्यादी विक्रीसाठी स्टॉल / दुकाने इत्यादी लावू नयेत.

आरतीच्या वेळी मंडपात दहापेक्षा जास् कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेतत्यांनी  ‘मास्आणि सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

कोरोना विषाणुची गंभीर आपत्ती लक्षात घेता मंडप सजावट / रोषणाई / देखावे करु नयेत.

मंडळातर्फे जनजागरण / रक्तदान, आरोग् तपासणी, लोकापयोगी आरोग्याभिमुख कार्यक्रम आयोजित करावेत.

शक्यतो व्यावसायिक जाहिराती करु नयेत. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने विहि करण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन पोलीस / महापालिका प्रशासनास सहकार्य करावे.

सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावातच करावे.

गणेशोत्सवा दरम्यान धार्मिक, भक्तीपर, . गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.

गणेश मूर्तीच्या आगमन विसर्जनच्यावेळी १० पेक्षा अधि लोक असणार नाहीत ते मास् वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील याची खबरदारी घ्यावी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येवू नये.

गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.*

उत्सवप्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणुचा फैलाव होईलतसे केल्यास साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ भारतीय दंड संहिता १८६० कायदान्वये कारवाई करण्यात येईल.

घरगुती गणेशोत्सव साजरा करताना...

घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावेआगमनासाठी जास्तीत जास्त व्यक्तिंचा समूह असावा. आगमनप्रसंगी मास्क / शिल्ड  स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरण्यात यावी आणि सामाजिक अंतरासंबंधीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविड-१९ साथरोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.

भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे.  (त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल).

गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.

गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे.

विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नयेविसर्जनासाठी जास्तीत जास्त व्यक्तिंचा समूह असावात्यांनी देखील मास् वापरावे सामाजिक अंतराच्या नियमांची काटेकोर पालन करावे.

नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाण्याचे शक्यतो टाळावे.

घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेण्यास मनाई राहील.

विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्क / शिल्ड स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत.शक्यतो  लहान मुले वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.पालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

जर विसर्जनाच्या तारखेच्या दिवशी घरगुती गणपती स्थित असलेली इमारत / चाळ जर ‘’सिल् इमारत’’ (sealed building) मध्ये असेल तर त्यांना विसर्जनासाठी घरगुती गणेशमुर्ती बाहेर घेवून जाण्यास परवानगी असणार नाहीत्यांना सदर गणेशमुर्तीचे विसर्जन बादलीमध्ये किंवा ड्रममध्ये करणे बंधनकारक राहील.

कोरोना विषाणूचा फैलाव होईल असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ भारतीय दंड संहिता १८६० कायद्यान्वये कारवाई होईल.

 

मागे

मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी
मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी

मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल से....

Read more