ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सिसिडीच्या मालकाचा मृतदेह नेत्रावती नदीत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सिसिडीच्या मालकाचा मृतदेह नेत्रावती नदीत

शहर : mangalore

'कॅफे कॉफी डे' चे मालक व्ही.जी.सिद्धार्थ यांचा मृतदेह 36 तासानंतर नेत्रावती नदीत सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे ते  जावई होते. सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्याचे कळताच कर्नाटक पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती. सकलेश पुरच्या वाटेवर असताना सोमवारी रात्री त्यांनी कार चालकाला कार मंगळुरूच्या दिशेने वळविण्यास संगितले. आणि उच्छाल येथे ते नदीच्या पूलापाशी कारमधून उतरले. ड्रायवर ला गाडी पुढे नेऊन थांबविण्यास संगितले. मी चालत येतो असे ते म्हणाले. तेव्हाच त्यांना अखेरचे पाहिले होते. ते बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनी सिसिडीचे संचालक मंडळ आणि कर्मर्‍यांना उद्देशून लिहिलेले पत्र हस्तगत करण्यात आल. त्यात त्यांनी एका चांगल्या व्यवसायाचा आराखडा न उभारता आल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच आपण परिस्थितीचा सामना केला पण अखेर याच परिस्थितीपुढे हतबल होत आपल्याला हात टेकावे लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आर्थिक व्यवहार प्रकरण आणि आयकर विभागाकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

मागे

3 हजार वाघांच्या सरंक्षणासाठी भारत कटिबद्ध : नरेंद्र मोदी
3 हजार वाघांच्या सरंक्षणासाठी भारत कटिबद्ध : नरेंद्र मोदी

भारतात सध्या 3 हजार वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे. त्याम....

अधिक वाचा

पुढे  

पहिल्या महिला आमदार डॉ. रेड्डी यांना आदरांजली
पहिल्या महिला आमदार डॉ. रेड्डी यांना आदरांजली

भारतातील पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या महिला शल्यचिकित्सक डॉ. मुथुलक्ष्....

Read more