ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्र सरकार २०० लढावू विमाने खरेदी करणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्र सरकार २०० लढावू विमाने खरेदी करणार

शहर : देश

        नवी दिल्ली – पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशदवादी हल्ले, चीनकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेवून हवाई दल सुसज्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. म्हणूनच केंद्र सरकारने लवकरच वायुसेनेला २०० लढाऊ विमानं मिळणार असल्याच सांगितलं आहे. त्यासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत करार सुरू असल्याची माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी दिली आहे. एचएएल कंपनी ८३ कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क १ तयार करणार असून इतर ११० विमानांचे प्रस्ताव मागवले आहेत. 


     एकूण २०० लढावू विमानं खरेदी करणार असल्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. "विमानं लवकरात लवकर तयार केली जातील आणि त्यासाठी पहिले लढावू विमानांचे डिझाईन पाहिले जाईल. यानंतर ८ ते १० विमानं तयार करण्यात येतील." दरम्यान, "भारतीय वायुसेनेकडे मिराज २०००, ३० सुखोई, मिग २९, आणि मिग २१ बायसन लढाऊ विमानं आहेत’.

 

     जर आपल्याला अजून गरज लागली तर आपण यापेक्षाही अधिक विमाने घेवू शकतो" असंही अजय कुमार यांनी सांगितलं. अशी ही २०० विमाने भारताच्या सैन्यदलात आली की, भारतीय सैन्य दल अधिक सुसज्य होईल असे म्हंटले जात आहे. 

मागे

नोकरीचे आमिष दाखवून महिलेने केला विश्वासघात
नोकरीचे आमिष दाखवून महिलेने केला विश्वासघात

          कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे खोटे आमि....

अधिक वाचा

पुढे  

दूध दरवाढीचा लाभ व्यावसायिकांना
दूध दरवाढीचा लाभ व्यावसायिकांना

    पुणे - वर्षाच्या सुरुवातीलाच दूध दरवाढीची झळ सामान्य वर्गाला बसली आ....

Read more