ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धरावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

धरावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

शहर : मुंबई

मुंबई मुंबईतील दुर्दैवी घटकांची मालिका काही थांबत नाही. गोरेगाव आणि वरळी येथे चिमुकल्यांचा नाल्यात बळी गेल्याची उदाहरणे ताजी असतानाच धरावीत ७ वर्षाचा अमित जैसवाल नावाचा मुलगा नाल्यात पडून मरण पावला. गेल्या पाच दिवसातील ही तिसरी घटना आहे.

अमित जैसवाल नाल्याजवळ घेकडा पकडायला गेला असताना नाल्यात पडला आणि मरण पावला. घटनास्थळी नाल्यावर कोणतीही संरक्षक भिंत किंवा जाळी नाही. याबाबतीत स्थानिकांनी प्रशासकाकडे वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. या आधी गोरेगाव मध्ये दिव्यांश सिंह हा चिमुकला गटारात पडला. पाच दिवस उलटले तरी त्याचा मृतदेह सापडत नाही. दुसरीकडे कोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून परवाच १२ वर्षाच्या मुलाचा जीव गेला. त्यात आता अमित जैसवालच्या मृत्युची भर पडली आहे.

मागे

ठाण्यात 2 मुले तर  मुंबईत तरुण बुडाला
ठाण्यात 2 मुले तर  मुंबईत तरुण बुडाला

ठाण्यात घरी न सांगता खाडीत पोहण्यासाठी गेलेले शुभम देवकर (वय 15) व प्रवीण कंचा....

अधिक वाचा

पुढे  

उध्वस्त तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार
उध्वस्त तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

मुंबई-रत्नागिरीत चिपळूनमध्ये मुसळधार पावसाने २ जुलै रोजी तिवरे धरण फुटून २....

Read more