ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

जीवंत व्यक्तीला मृत दाखवून परस्पर विकले फ्लॅट

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 05, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जीवंत व्यक्तीला मृत दाखवून परस्पर विकले फ्लॅट

शहर : navi Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे सध्या गायब झालेत. जीवंत व्यक्तिला मृत दाखवून 2 फ्लॅट परस्पर विकल्याप्रकरणी गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूकही लढविली. मात्र निवडणूक संपताच ते बेपत्ता झाले असून नेरूळ पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सुधाकर कुलकर्णी यांचे नेरूळमधलील श्री गणेश सोसायटीमधील 2 फ्लॅट आहेत. 13 एप्रिल 2019 रोजी त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे पुत्र कौस्तुभ कुलकर्णी सोसायटीत गेले तेव्हा त्यांना कळले की, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी सुधाकर कुलकर्णी यात असतानाच 2006 मध्ये त्यांच्या मृत्युचा दाखला तयार करून त्यांचे दोन्ही फ्लॅट संतोष तावरे यांना विकले आहेत. हे ऐकून कौस्तुभ यांना धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार प्लीस गावडे यांच्या चौकशीसाठी त्यांच्या घरी धडकले. तेव्हा ते फरार झाले होते अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान गावडे यांनी अटकपूर्व जामीन साठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे.

 

मागे

धावत्या एसटी बसमध्ये चालकाला हृदयविकारचा झटका
धावत्या एसटी बसमध्ये चालकाला हृदयविकारचा झटका

मुंबईहून कराडकडे जाणार्‍या धावत्या एसटी बसमध्ये चालक मारुती पवार (39) यांना ....

अधिक वाचा

पुढे  

पालघर जिल्ह्याला सावधानतेचा इशारा
पालघर जिल्ह्याला सावधानतेचा इशारा

पालघर जिल्ह्याला आठ तारखेपर्यंत 'महा' नावाच्या चक्रीवादळासह अतिवृष्टीच....

Read more