ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

शहर : मुंबई

मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. मुंबईत काल रात्री पासूनच काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी श्रीगणेशमूर्ती वाजतगाजत मिरवणुकीतून आणल्या. आजही सकाळी घरगुती श्रीगणेशमूर्ती नेताना अनेक भाविक दिसत होते. सुट्टी असल्याने वाहनांची वर्दळ फारसी दिसत नव्हती. सर्वत्र 'गणपती बाप्पा मोरया' अशा घोषणा देत बाप्पांचे आगमन झाले तर काही प्रमुख मंडळानी 8-15 दिवस आधीच गणेशमूर्ती मंडपात विराजमान केली होती.

उत्सव सुरू, वाहतूक थांबली

आज पासून गणेशोत्सव सुरू झाला असला तरीही गणेशोत्सवासाठी कोकणात जात असलेल्या आणि गेलेल्या चाकरमान्याचे प्रवासात कमालीचे हाल झाल्याचे वृत आहे. कारण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनाना बंदी घातली होती, बर्‍याच मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबई गोवा महामार्गावर वळवली मात्र मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी आणि रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. परिणामी 8 तासाच्या प्रवासाला 20-22 तास लागले. तर कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने विशेष रेल्वे गाड्या सोडल्याने 5-6 तास प्रवासास विलंब झाल्याचे दिसून आले. अशा स्थितीत शनिवारी, रात्री पनवेल-महाड मार्गावर एसटी बस जळाली. त्यामुळे कोकणात जाणार्‍या वाहनाच्या 4-5 किमी. लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर वाहतुकीचा पुन्हा एकदा बोजवारा उडल्याचे दिसून आले.

 

मागे

देशभरात वाहतुकीचे नवीन नियम होणार कार्यरत
देशभरात वाहतुकीचे नवीन नियम होणार कार्यरत

 बर्‍याच दिवसांपासून वाहतुकीचे नवीन नियम व दंड आकारण्याचे कायदे निर्माण....

अधिक वाचा

पुढे  

चांद्रयान 2 मधील ऑर्बिटरपासून विक्रम लॅडर झाले वेगळे
चांद्रयान 2 मधील ऑर्बिटरपासून विक्रम लॅडर झाले वेगळे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्वाकांक्षी मोहीम असलेले चंद्रयान 2 अगदी ज....

Read more