ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

जेटच्या 'लँडिंग'नंतर माणुसकीचं 'टेक ऑफ'; कर्मचाऱ्यांच्या मदतीला सोशल मीडिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 02:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेटच्या 'लँडिंग'नंतर माणुसकीचं 'टेक ऑफ'; कर्मचाऱ्यांच्या मदतीला सोशल मीडिया

शहर : मुंबई

केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या आकाशात भरारी घेणारी भारतीय विमान कंपनी जेट एअरवेजची सेवा आर्थिक संकटामुळे बंद झाली आहे. मे रोजी सुरू झालेला जेट एअरवेजच्या वैभवशाली वाटचालीचा दुर्दैवी शेवट सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. जेटच्या कायमस्वरूपी 'लँडिंग'मुळे तब्बल २२ हजार कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झालेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं कसं पेलायचं, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकलाय. परंतु, आपल्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून झटलेल्या या कर्मचाऱ्यांचा आधार देण्यासाठी सोशल मीडिया पुढे सरसावला आहे. ट्विटरवर #Letshelpjetstaff हा हॅशटॅग व्हायरल झाला असून अनेक छोटे-मोठे व्यावसायिक जेटची नोकरी गमावलेल्या तरुण-तरुणींना नोकरीची ऑफर देत आहेत. जे झालं ते वाईट असलं, तरी त्यानंतरची माणुसकीची झेप नक्कीच दिलासादायक आहे.

देशात घडणाऱ्या घटनांचे पडसाद, त्यावरच्या प्रतिक्रिया हल्ली लगेच सोशल मीडियावर उमटतात. एखादी मोठी बातमी आली रे आली की, कधी एकदा ट्विट करतो किंवा फेसबुकवर पोस्ट 'पाडतो', असं उत्साही नेटकऱ्यांना होतं. परंतु, या उक्तीला त्याला कृतीची जोड नसल्याची टीका बऱ्याचदा होते. यावेळी मात्र, जेट एअरवेज बंद झाल्याबद्दल फक्त हळहळ व्यक्त करता, सोशल मीडिया जेट कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. ट्विटरवरून काही उद्योजकांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना जॉब ऑफर केलेत. जेटइतका पगार आम्ही देऊ शकणार नाही, पण पर्मनन्ट नोकरीची हमी हे व्यावसायिक देत आहेत.

त्याचवेळी, जेटच्या कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटचे सीएमडी अजय सिंह यांनीही ऑफर दिली आहे. १०० पायलट, २०० हून अधिक केबिन क्रू आणि २०० पेक्षा जास्त टेक्निकल-एअरपोर्ट स्टाफ घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.जेट एअरवेजने अनेकदा प्रवास केलेले केके बुक्सचे मालक के श्रीनिवासमूर्ती यांचं ट्विटही चांगलंच व्हायरल होतंय. फक्त सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी मला या कर्मचाऱ्यांना मदत करायला आवडेल, 'कस्टमर रिलेशन' विभागात दोन कर्मचाऱ्यांना मी संधी देऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय.

पब्लिक रिलेशन क्षेत्रात काम करणाऱ्या अमित प्रभू यांनी, पर्यायी करिअर शोधणाऱ्यांसाठी दहा जागा असल्याचं ट्विट केलंय. रेडिओ मिर्चीला कन्टेंट रायटर आणि रेडिओ जॉकी हवे आहेत, इच्छुक जेट कर्मचारी अर्ज करू शकतात, असं ट्विट प्रोग्रॅमिंग हेड इंदिरा रंगराजन यांनी केलं आहे.इतरही अनेक व्यावसायिक आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांबाबत ट्विटर, फेसबुकवरून माहिती देत आहेत. जेट एअरवेज कर्मचाऱ्यांना ते प्राधान्य देणार आहेत. 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ', ही उक्ती या निमित्ताने प्रत्यक्षात येताना दिसतेय. आजच्या काळात ही नक्कीच सुखावणारी बाब आहे.

 

मागे

नळदुर्ग  किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू
नळदुर्ग किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सकाळी पावणेदहाच्या सुमारास 7 ते 8 मुल....

अधिक वाचा

पुढे  

तिसऱ्या विनाशिका आयएनएस इंफाळचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण
तिसऱ्या विनाशिका आयएनएस इंफाळचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण

विशाखापट्टम वर्गातील तिसऱ्या विनाशिकेचे आयएनएस इंफाळचे आज नौदल प्रमुखांच....

Read more