ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 11:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी

शहर : पुणे

कोरोनाशी लढा देण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात असताना, पुण्यातील रेल्वे स्थानकात वेगळंच चित्र आहे.  पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच गर्दी आहे. सुट्ट्यांमुळे अनेकजण गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली आहे. मात्र हीच गर्दी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे या गर्दीतून तो आणखी बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे पिंपरी 12 आणि पुणे 9 मिळून 21 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

असं असताना जे कामानिमित्त पुण्यात राहतात, ते आता शनिवार आणि रविवारी साधून पुणे सोडणे पसंत करत आहेत. परिणामी रेल्वे स्टेशन खचाखच भरलं आहे. मात्र त्यामुळे कोरोना बळावण्याचा धोका आणखी वाढला आहे.

अजित पवारांचं आवाहन

कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावलं उचलत आहे. मात्र नागरिकांनी गर्दी कमी करुन कोरोनाचा संसर्ग (Ajit Pawar on Pune transport) टाळायला हवा. मुंबईतील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत आहे. तोच विचार पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनावश्यक प्रवास टाळावा, जर अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा नाईलाजास्तव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले.

सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ते निर्णय पुढचे आदेश निघेपर्यंत कायम राहतील. मुंबई, पुणे, पिंपरी  आणि नागपुरातील अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व  दुकाने, कार्यालये बंद राहतील, असं अजित पवारांनी सांगितलं.

मागे

'ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक', नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम
'ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक', नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्....

अधिक वाचा

पुढे  

कनिका कपूरच्या एका चुकीमुळे संसदेपर्यंत कोरोना, किती जणांच्या संपर्कात ?
कनिका कपूरच्या एका चुकीमुळे संसदेपर्यंत कोरोना, किती जणांच्या संपर्कात ?

गायिका कनिका कपूर १२ दिवस आधी लंडनवरुन भारतात आली त्यावेळी कोरोना पॉझिटीव्....

Read more