ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कनिका कपूरच्या एका चुकीमुळे संसदेपर्यंत कोरोना, किती जणांच्या संपर्कात ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 07:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कनिका कपूरच्या एका चुकीमुळे संसदेपर्यंत कोरोना, किती जणांच्या संपर्कात ?

शहर : देश

गायिका कनिका कपूर १२ दिवस आधी लंडनवरुन भारतात आली त्यावेळी कोरोना पॉझिटीव्ह होती. तिने स्वत:सोबत इतरांचीही काळजी केली नाही. लखनऊमध्ये ती - पार्ट्यांमध्ये होती. कानपूर देखील गेली. दरम्यान तीनशे ते चारशे जणांच्या संपर्कात आली. लखनऊ ती ज्या पार्टीत होती ती राजकीय पार्टी होती. यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, त्यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह तसेच उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह देखील होते. अनेक नेत्यांचे कुटुंब देखील इथे होते.

आता वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. पण कोरोनाची ही साखळी बनत चालली आहे. खासदार दुष्यंत सिंह हे संसदनाच्या कार्यात सहभागी राहीले तसेच दरम्यान त्यांनी राष्ट्रपतींची भेट देखील घेतली. या काळात दुष्यंत सिंह यांच्या संपर्कात आलेल्या दिपेंद्र हुड्डा, अनुप्रिया पटेल, डेरेक ब्रायन यांनी देखील स्वत: आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांसहित शेकडो व्यक्ती पार्टीला गेल्या नसत्या आणि त्यांनी समजदारी दाखवली असती, स्वत: पार्टीला जाता इतरांनाही यापासून रोखले असते. तर आज लखनऊ पासून संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत भीतीचे सावट पोहोचले नसते.

आता कनिकाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्या पार्टीमध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि त्यांची मेडिकल कंडिशन काय आहे, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. सेलिब्रिटी व्यक्तीने का खबदारी घेतली नाही? तसेच लंडनवरुन परतल्यानंतर तिची तपासणी झाली होती का, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

तिने काय म्हटले आहे पोस्टमध्ये ?

सर्वांना नमस्कार, गेल्या चार दिवसांपासून मला फ्लूची लक्षणे दिसून आली आहेत, माझी स्वतःची चाचणी घेतली गेली आणि ती कोविड -१९ positive आहे. मी आणि माझे कुटुंबीय आता पूर्णपणे अलग  आहोत आणि पुढे कसे जायचे या वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरन करीत आहोत. मी ज्या लोकांच्या संपर्कात आहे त्यांचे संपर्क मॅपिंग तसेच सुरू आहे. १० दिवसांपूर्वी जेव्हा मी घरी परतले, तेव्हा सामान्य प्रक्रियेनुसार मला विमानतळावर स्कॅन केले गेले. पण तसे काही दिसून आले नाही. मी नॉर्मल असल्याचे दिसून आले.

                                                 

मागे

प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी
प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी

कोरोनाशी लढा देण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात असता....

अधिक वाचा

पुढे  

भारतात ही हळूहळू वाढत चालला आहे कोरोना, एका आठवड्यात रुग्णांची संख्या ८९ वरुन २५० वर
भारतात ही हळूहळू वाढत चालला आहे कोरोना, एका आठवड्यात रुग्णांची संख्या ८९ वरुन २५० वर

चीन आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. इतर देशांमध्ये देखील....

Read more