ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'चांद्रयान २'च्या 'विक्रम'चा ठावठिकाणा नाहीच - नासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2019 04:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'चांद्रयान २'च्या 'विक्रम'चा ठावठिकाणा नाहीच - नासा

शहर : देश

इस्रोच्या 'चांद्रयान ' या महत्त्वकांक्षी अभियानादरम्यान विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 'हार्ड लँडिंग'मुळे त्याचा सप्टेंबर रोजी ग्राऊंड स्टेशनशी संपर्क तुटला. त्यानंतर अद्यापही त्याची सद्यस्थिती, त्याचं ठिकाण शोधण्यास यश मिळालं नसल्याची माहिती अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने (NASA) दिली आहे. 'विक्रम' लँडर ज्या भागात चंद्रावर उतरले त्या भागाचे काही फोटो आज पुन्हा एकदा 'नासा'कडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

'नासा'च्या लूनर रिकोनॉयसेंश ऑर्बिटर (Lunar Reconnaissance Orbiter) या स्पेसक्राफ्टने १७ सप्टेंबर रोजी लँडर ज्या भागात चंद्रावर उतरले त्या भागाची काही छायाचित्रे घेतली. 'नासा'ने हे फोटो ट्विट करत, प्रखर सूर्यप्रकाश आणि धूळ, तर काही भागात सावली असल्याने 'विक्रम'चा अचूक शोध घेणे कठीण झाले. त्यामुळे अद्यापही विक्रमचा ठावठिकाणा लागला नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.

यानंतर, ऑक्टोबर महिन्यात या भागाचे पुन्हा एकदा फोटो घेतले जातील, असंही नासानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ऑक्टोबरमध्ये, प्रकाशाची स्थिती अनुकूल असल्याने पुन्हा एकदा लँडरचं स्थान शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची शक्यता नासाने वर्तवली आहे.

 

मागे

ऑक्टोबर महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार
ऑक्टोबर महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार

पुढील महिन्यापासून दसरा-दिवाळी सण सुरु होणार आहेत. त्यामुळे बँकांना या महि....

अधिक वाचा

पुढे  

उद्या शिवसेनेवरही हीच वेळ येईल- जयंत पाटील
उद्या शिवसेनेवरही हीच वेळ येईल- जयंत पाटील

भाजप विरोधकांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. आज राष्ट्रवा....

Read more