ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 08:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

शहर : मुंबई

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  राजेश टोपे यांनी आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. त्यावेळी हे आवाहन केले.

टोपे यांनी गर्दी नियंत्रणाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असं आवाहन त्यांनी केले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून अनेक निर्बंध उपाय योजले आहेत. मुंबई महानगर प्रदेशसह चार शहरे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर अनेक लोक भीतीने आपल्या गावी परतत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.

रेल्वे स्टेशन, बस थांबे आणि अनेक ठिकाणी गावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसत आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, संध्याकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीएसएमटी स्थानकाला भेट देत आढावा घेतला. लोकलमध्ये आता २० ते २५ टक्के गर्दीच आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १८६१ प्रवासी आले आहेत. लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी ट्विट केली आहे.  कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत.पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत,त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असेही आवाहन केले आहे.

                                                    

मागे

जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असलेल्या व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचला कोरोना
जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असलेल्या व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचला कोरोना

कोरोना व्हायरस जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी देखील पोहोचला आहे. अमेरिकेचे ....

अधिक वाचा

पुढे  

लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल
लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल

कोरोना व्हायरसच्या (coronavirus)वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अर....

Read more