ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कला ,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांवर उपासमारीची वेळ  

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कला ,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांवर उपासमारीची वेळ  

शहर : मुंबई

         राज्यातल्या कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या शिक्षकांवर बेकारीची भयाण कुऱ्हाड कोसळली असून त्यांना शिक्षक म्हणून जगू देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. राज्यप्रकल्प संचालक, प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या अंदाजपत्रक व कार्य योजनेतली तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीची विद्यार्थी संख्या शंभर किंवा त्याहून अधिक आहे अशा शाळांमध्ये स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती मार्फत २०१२ वर्षात या शिक्षकांची (निर्देशकांची) नेमणूक करण्यात आली होती. परंतु 2020 हे वर्ष उजाडले तरी प्रशासनाची काहीही हालचाल दिसत नाही.


       गेली पाच वर्षे एक दमडीही न मिळालेल्या कलाशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून तुटकी फुटकी कामे करून, स्वतःच्या उरल्यासुरल्या बांधावर  जाऊन पोट भरण्याची वेठबिगरीची वेळ कला शिक्षकांवर आली आहे. मागील सरकारला अर्ज निवेदने देऊन, आंदोलने उपोषणे करून शिक्षक थकले पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारने या  शिक्षकांच्या मागण्या केराच्या टोपलीत टाकून सरकारी अनास्था ठळकपणे दाखवून दिल्याने कला शिक्षकांची रोजची परवड सुरूच राहिली. मागील शासनाच्या अनास्थेपणामुळे या शिक्षकांवर ही वेळ आली आहे. आता नव्याने सत्तेवर आलेले सरकार आपल्या मागण्या मान्य करून आपली कर्तव्यदक्षता दाखवून देईल व आपल्या मागण्या पूर्ण होतील अशी आशा आता या कलाशिक्षकांना वाटत आहे.

 

       आज राज्यात सहा हजारा शाळांमधून अठरा हजार कला शिक्षक तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे चौदा शाळांमधून सहाशे बेचाळीस कलाशिक्षक कार्यरत आहेत. या सर्व अठरा हजार कला शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, या वाकप्रचाराचा प्रत्यय राज्यातल्या सर्व शिक्षकांना येत असून मायबाप असलेलं सरकार या शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय देईल, अशी अपेक्षा शिक्षक व्यक्त करत आहेत.


     एक शिक्षक उद्याची भावी पिढी घडवत असतो त्या पिढीला सृजनशील बनवण्याचे काम एक शिक्षकच करत असतो पण आज त्याच शिक्षकावर उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे.गावखेड्यातील  जिल्हापरिषद शाळेत दूरदूरच्या खेडोपाड्यातून मैलांचा प्रवास करून येणारे हे कला शिक्षक आपल्या प्रामाणिक सेवेतून  उद्याची भावी पिढी घडवत आहेत पण एका पिढीला घडवत असताना या सर्व कला शिक्षकांना आज उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे.गेल्या पाच वर्षात तुटपुंज मिळणारे मानधन बंद होऊनही अविरतपणे चिमुरड्यांना शिकवत राहिलेल्या या कलाशिक्षकांना पटाची अट शिथिल करून शासकीय सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावे व आपल्या पाल्याला कृतीयुक्त शिक्षण मिळावे, अशी मागणी पालकवर्गातूनही होत आहे.


       शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असतानाही हे सर्व कला शिक्षक प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. पुस्तकी ज्ञानाने परिक्षेपुरता तयार होणाऱ्या  विद्यार्थ्यांत कलेची आवड रुजवून ती जोपासण्याचेही काम हे कला शिक्षक करत असतात. कला क्रीडा अश्या कृतीयुक्त शिक्षणासाठी आज राज्यातल्या प्रत्येक शाळेत कला शिक्षक हवाच आणि तोही वेठबिगार म्हणून नको तर हक्काच्या कलेसाठी हक्काचा कला-क्रीडा, कार्यानुभवाचा शासकीय सेवेत कायम झालेला कला शिक्षक हवाच.

 

प्रतिनीधी: अनुज केसरकर

मागे

इराकमधील २५ हजार भारतीयांचे भवितव्य धोक्यात ?
इराकमधील २५ हजार भारतीयांचे भवितव्य धोक्यात ?

       एरबिल - इराकमधील अमेरिकेचे दुतावास आणि सैन्य इराणकडून लक्ष्य केल....

अधिक वाचा

पुढे  

कुख्यात गुंड एजाज लकडावालाला अटक
कुख्यात गुंड एजाज लकडावालाला अटक

       मुंबई - गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून अटक कर....

Read more