ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निजामाची संपती भारताकडेच

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निजामाची संपती भारताकडेच

शहर : विदेश

गेल्या 70 वर्षापासून  हैदराबादच्या निजामाच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या खटल्यात  ब्रिटनच्या हायकोर्टाने अखेर भारताच्या बाजूने निकालाचा कौल दिला आहे . भारताच्या फाळणीच्या वेळी निजामाची लंडनच्या एका बँकेत जमा असलेल्या रक्कमेबाबत भारत पाकिस्तान मध्ये खटला सुरू होता.या रकमेवर भारत आणि निजामाच्या  उत्तराधिकारीचा अधिकार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

गेल्या 70 वर्षांपासून हा खटला सुरु होता. निजामाचे वंशज प्रिन्स मुकर्रम जाह आणि त्यांचे धाकटे बंधू भाई मुफ्फखम जाह यांनी या खटल्यात भारत सरकारची साथ दिली. फाळणी झाली तेव्हा हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खानने लंडनमधील नेटवेस्ट बँकेत 1007940 पौंड म्हणजे जवळपास 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते.

निजामाने जमा केलेली ही रक्कम आता 35 मिलियन पौंड म्हणजे 3 अब्ज 8 कोटी 40 लाख रुपये झाली आहे. या मोठ्या रकमेवर भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्राकडून दावा करण्यात आला. हैदराबादचा सातवा निजाम उस्मान अली खान या रकमेचे मालक होते आणि त्यांचे वंशज, भारत हे आता दावेदार आहेत, असं लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायमूर्ती मार्कस स्मिथ यांनी स्पष्ट केलं.

   

मागे

गर्दीने बदनाम पण स्वच्छतेत अग्रेसर
गर्दीने बदनाम पण स्वच्छतेत अग्रेसर

नुकतेच देशपातळीवर रेल्वेच्या स्थानकावरील स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात आ....

अधिक वाचा

पुढे  

चार दहशतवादी घुसल्याची चर्चा,देशात हाय अलर्ट जारी
चार दहशतवादी घुसल्याची चर्चा,देशात हाय अलर्ट जारी

दिल्लीमध्ये चार दहशतवादी घुसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात रेड अ....

Read more