ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

८ वी पास असणार्‍यांसाठी पोस्टात नोकरीची संधी 

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2020 03:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

८ वी पास असणार्‍यांसाठी पोस्टात नोकरीची संधी 

शहर : delhi

           नवी दिल्ली : ७ व्या आयोगांतर्गत पोस्टामध्ये अनेक पदांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे. ८ वी पास असलेल्या युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. 

            भारतीय पोस्ट विभागाला स्कील्ड आर्टिसन्स, मोटर व्हिकल मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅक स्मिथ आदी पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान ८ वी पास असावा. मोटर व्हीकल मेकॅनिक पदासाठी अर्ज करणार्‍या उमेद्वाराकडे अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स असणे आवश्यक आहे. 

            या भरतीसाठी कमीत कमी वयोमर्यादा १८ वर्षे आहे. तर अधिकाधिक वयोमार्यादा ३० वर्षे इतकी आहे. ओबीसी वर्गासाठी वयोमार्यादेत ३ वर्षांची तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही. 

           या भरतीवेळी उमेद्वारांना २ के अंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. १९ हजार ९०० रुपये प्रतिमहिना असं सुरुवातीचं वेतन असेल. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारला (सीनीयर मॅनेजर, मेल मोटर सर्विसेस, १३४-ए, एस.के. अहिर मार्ग, वरळी मुंबई - ४०००१८) या पत्त्यावर फॉर्म आणि कागदपत्र पाठवावी लागणार आहेत.   

मागे

"तारक मेहता..." चे मेकअप आर्टिस्ट आनंद परभार यांचे निधन 

            मुंबई : घराघरात लोकप्रिय ठरलेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून ....

अधिक वाचा

पुढे  

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

          नवी दिल्ली : डायरोक्टोरेट जनरल, सीआरपीएफ, गृहमंत्रांच्या आदेश....

Read more