ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कल्याण-डोंबिवलीत २० दिवसात वाढले ९५४९ रूग्ण, १३० रुग्णांचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 07:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कल्याण-डोंबिवलीत २० दिवसात वाढले ९५४९ रूग्ण, १३० रुग्णांचा मृत्यू

शहर : kalyan

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीत भागात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. अनलॉक चार सुरू झाल्यापासून पुन्हा कल्याण-डोंबिवलीत लक्षणीय रूग्ण वाढ होत आहे. गणपती विसर्जनपासून दररोज पाचशे हून अधिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण असले तरी नागरिकांचाच बेजबाबदारपणा याला कारणीभूत ठरत आहे.

अजूनही रस्त्यावर फिरताना मास्कन लावणे, मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी करणे आदी कारणामुळेच कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वीस दिवसात तब्बल 9549 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 130 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन नागरिकांना सतत आवाहन करत आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तर कंटेनमेंट झोनमध्ये परत एकदा बॅरिकेट लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

 

मागे

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा
पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात 2 लाख 57 हजा....

अधिक वाचा

पुढे  

शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन : विधेयकास २०७ संघटनांचा विरोध
शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन : विधेयकास २०७ संघटनांचा विरोध

केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर झालेल्या शेतकरी विधेयक कायद्यांना २०८ संघ....

Read more