ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 02:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा

शहर : पुणे

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात 2 लाख 57 हजार 409 एकूण कोरोनाबाधित रुग्ण असून यातील 1 लाख 72 हजार 732 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पुण्यात 79 हजार 489 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. पुण्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे.

पुण्यातील हडपसर, कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, नगर रोड या ठिकाणी कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या शहरांमध्ये एकूण 71 प्रतिबंधित क्षेत्र असतील. या भागात महापालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत.

पुण्यातील धनकवडी, बालाजीनगर, सिद्धी हॉस्पिटल परिसर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल परिसर, रजनी कॉर्नर या ठिकाणांची नव्या प्रतिबंधित क्षेत्रांची नोंद झाली आहे.

तर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कोंढवा बुद्रुक, शांती नगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर, कपिल नगर, लक्ष्मी नगर, साई नगर गल्ली नंबर 1 ते 9; सिंहगड रोड परिसरातील वडगाव खुर्द, मॅंगो नेस्ट सोसायटी, सन सिटी रोड, आनंदनगर, धायरी गल्ली नंबर 17; शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील शिवाजीनगर भांबुर्डा, आशा नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखलेनगर, वडगाव शेरी येथील कुमार प्राईम वेरा, घोरपडी येथील पाम ग्रु सोसायटी, घोरपडी लक्ष्मी टेरेस सोसायटी या नव्या भागांची नोंद केली आहे.

दरम्यान यापूर्वीचे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, पर्वती लक्ष्मी नगर, गुरुवार पेठ, महात्मा फुले, घोरपडी पेठ, वारजे कर्वेनगर ,कोथरूड, बावधन, औंध ,बाणेर हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र कायम आहेत.दरम्यान पुणे शहरात कोरोनाबाधितांची एकूण ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 17 हजार 664 झाली आहे. त्यात 6 हजार 773 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहे. तर होम आयसोलेशनमध्ये 10 हजार 891 रुग्ण उपचार घेत आहेत.

मागे

मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी
मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी म....

अधिक वाचा

पुढे  

कल्याण-डोंबिवलीत २० दिवसात वाढले ९५४९ रूग्ण, १३० रुग्णांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवलीत २० दिवसात वाढले ९५४९ रूग्ण, १३० रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीत भागात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ ह....

Read more