ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरचं 'पायलट' होण्याचं स्वप्न साकार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरचं 'पायलट' होण्याचं स्वप्न साकार

शहर : देश

देशातील पहिला ट्रान्सजेंडर प्रायवेट पायलट एडम हॅरीचं विमान उडवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. केरळ सरकारने हॅरीला व्यवसायिक परवानाच्या शिक्षणाकरता 23 लाख रुपये मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एडम हॅरी 20 वर्षांचा आहे. हॅरीची चुक इतकीच आहे की, तो ट्रान्सजेंडर आहे. यामुळे त्याला घरातून बेघर केलं होतं.

एडम हॅरीकडे खासगी पायलट परवाना आहे. प्रवासी विमान उडवण्याकरता त्याच्याकडे व्यावसायिक परवाना असण्याची गरज आहे. कुटुंबाने घरातून काढून टाकल्यावर त्याच्याकडे या शिक्षणाची फी भरण्याचे देखील पैसे नव्हते. त्याची तीन वर्षांची ट्रेनिंग फी ही 23.3 लाख रुपये इतकी असणार आहे.

केरळ सरकारने घोषणा केली आहे की, हॅरीची ट्रेनिंग थांबू देणार नाही. केरळ सरकार ट्रेनिंगचा पूर्ण खर्च करणार आहे. आता हॅरी तिरूवंतपुरमच्या राजीव गांधी एविएशन टेक्नॉलॉजी अकॅडमीतून शिक्षण पूर्ण करणार आहे. रूढी परंपरा सांभाळणाऱ्या हॅरीच्या पालकांनी त्याला ट्रान्सजेंडर असल्यामुळे मारहाण देखील केली. त्याला घरात कोंढून ठेवलं होतं. यातून स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं.

एडम हॅरी हा पहिला ट्रान्सजेंडर आहे ज्याला खासगी पायलटचा परवाना मिळणार आहे. एडम हॅरीने राज्याच्या सामाजिक न्याय विभाग आणि त्यांचे सचिव बीजू प्रभाकर यांना आपला संघर्ष सांगितला. त्यांनी हॅरीचा संघर्ष ओळखून त्याला मदत केली. यामुळे हॅरी त्यांचे मनापासून आभार मानतो. जर सरकारने मदत केली नसती तर माझं स्वप्न अर्धवटचं राहिलं असतं.

मागे

एकीकडे मंदीची झळ, दुसरीकडे वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ
एकीकडे मंदीची झळ, दुसरीकडे वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ

एकीकडे मंदीची झळ बसतेय. तर दुसरीकडे देशभरात कोट्यधीशांची संख्या वाढली आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

मोदींच्या स्वच्छता अभियानावर नेटकऱ्यांची टीका
मोदींच्या स्वच्छता अभियानावर नेटकऱ्यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चेन्न....

Read more