ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकीकडे मंदीची झळ, दुसरीकडे वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकीकडे मंदीची झळ, दुसरीकडे वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ

शहर : देश

एकीकडे मंदीची झळ बसतेय. तर दुसरीकडे देशभरात कोट्यधीशांची संख्या वाढली आहे. वर्षभरात कोट्यधीशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कोट्यधीशांची संख्या ९७ हजार ६८९ इतकी झाली आहे. तसंच आयकर परतावा भरणारे आणि करदाते यांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नोकरदार वर्गात या वर्षातल्या करोडपतींची संख्या तब्बल ४९ हजार १२८ वर गेली आहे. गेल्यावर्षी हीच संख्या ४१ हजारांच्या घरात होती. कोटींवर उत्पन्न जाहीर करून कर भरणाऱ्यांची संख्या .६७ लाखांवर गेली आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक जण कोट्याधीश झाले आहेत. राजस्व विभागाने शुक्रवारी करदात्यांचे संख्या आणि त्यांनी भरलेला कर याची माहिती दिली. २०१७-१८ मध्ये कोटीहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या ८१,३४४ होती.

आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात १९ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत एकूण .८७ कोटी लोकांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलं. .५२ कोटीहून अधिक व्यक्तिगत लोकं, ११.१३ लाख हिंदू अविभाजित कुटुंब, १२,६९ लाख फर्म आणि .४१ लाख कंपन्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरला.

 

 

मागे

औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण
औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीचे चटके आता मोठ्याप्रमाणात जाणवायला सुरुवात झ....

अधिक वाचा

पुढे  

देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरचं 'पायलट' होण्याचं स्वप्न साकार
देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरचं 'पायलट' होण्याचं स्वप्न साकार

देशातील पहिला ट्रान्सजेंडर प्रायवेट पायलट एडम हॅरीचं विमान उडवण्याचं स्व....

Read more