ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण उद्या दिसणार 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण उद्या दिसणार 

शहर : मुंबई

       मुंबई - या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी दि. १० जानेवारी म्हणजे उद्या पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते.


       उद्या रात्री १०:३८ वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री १२:४० वाजता जास्तीत जास्त म्हणजे ८९ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री २:४२ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून दिसेल असेही श्री. सोमण यांनी सांगितले.


          हे वर्ष चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ असणारे तसेच लीपवर्ष असल्याने कामासाठी वर्षात एक दिवस जास्त मिळणार आहे. खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शनासोबत ब्ल्यू मून दिसण्याचा योगही याच वर्षांत मिळेल.  
 

मागे

फाशी टाळण्यासाठी निर्भया प्रकरणातील आरोपींची केविलवाणी धडपड 
फाशी टाळण्यासाठी निर्भया प्रकरणातील आरोपींची केविलवाणी धडपड 

          नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकणातील एक दोषी विनय....

अधिक वाचा

पुढे  

इराकमधील २५ हजार भारतीयांचे भवितव्य धोक्यात ?
इराकमधील २५ हजार भारतीयांचे भवितव्य धोक्यात ?

       एरबिल - इराकमधील अमेरिकेचे दुतावास आणि सैन्य इराणकडून लक्ष्य केल....

Read more