ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

यंदा हापूस नैसर्गिक संकटात...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

यंदा हापूस नैसर्गिक संकटात...

शहर : मुंबई

फळांचा राजा म्हणजे 'हापूस' यंदा नैसर्गिक संकटात सापडला आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात एप्रिल, मे महिन्यात सुरू होणाऱ्या हापूसची आवक निम्म्यावर आली असून सुरुवातीच्या काळातील बोचरी थंडी आणि आता उन्हाचा चटका यामुळे मालाचा दर्जाही घसरलाय. त्यामुळे हापूसच्या आखाती देशातील निर्यातीवर परिणाम होत असून हंगाम लांबला असल्याची माहिती निर्यातदारांनी दिलीय. 

आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. एपीएमसी बाजारात एप्रिलपासून आंबा आवकीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात होत असते. परंतु यंदा हवामान बदल, थंडी लांबल्याने तसेच कडक उन्हामुळे हापूस उत्पादनावर परिणाम झाला असून ४० टक्केच उत्पादन आहे. आखाती देशात हापूस निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून आंबानिर्यात करावी लागते. आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा महत्त्वाचा असतो. मात्र, आताचा हापूस खार पडल्याने काळवंडलेला तर आकाराने अगदी लहान असा येत आहे.  हापूसच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्के हापूस एपीएमसीमध्ये तर ४० टक्के निर्यात होत असतो. १५ एप्रिलपासून हापूसच्या निर्यातीला वेग येतो, मात्र पुरेशा प्रमाणात व दर्जात्मक हापूस उपलब्ध नसल्याने केवळ ५ टक्के हापूसनिर्यात सुरू झाली आहे. एप्रिल ते मे अखेपर्यंत निर्यातीवर जोर असतो.

 

मागे

 पॅरिसच्या प्राचीन  850 वर्षं जुन्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग, इमारत भस्मसात.. शिखर कोसळलं
पॅरिसच्या प्राचीन 850 वर्षं जुन्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग, इमारत भस्मसात.. शिखर कोसळलं

पॅरिसच्या सर्वात प्राचीन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोत्र दाम कॅथेड्रल....

अधिक वाचा

पुढे  

बेरोजगारीमुळे उस्मानाबादच्या तरुणांना कर्नाटकमध्ये शोधावी लागते वधू...
बेरोजगारीमुळे उस्मानाबादच्या तरुणांना कर्नाटकमध्ये शोधावी लागते वधू...

उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव… या गावात किमान शंभर मुल लग्नाच्या वयाची ....

Read more