ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गांवर किमान इतके असणार प्रवासी भाडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2021 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गांवर किमान इतके असणार प्रवासी भाडे

शहर : मुंबई

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) एक चांगली आहे. मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) मार्गात आणखी दोन रुटची भर पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे लोकल सेवा (Mumbai Local) बंद आहे. लोकलला होणारी गर्दी लक्षात घेता नव्यान सुरु होणाऱ्या मेट्रोच्या दोन्ही मार्गांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता मार्गावर मेट्रोची चाचणी होणार आहे.

पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न आहे. तर जानेवारी 2022 पर्यंत मेट्रोचे दोन्ही मार्ग सुरु होतील असा विश्वास MMRDA ने व्यक्त केला आहे. मात्र, या मार्गावर किती भाडे असेल याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता निकाली निघाली आहे. या मार्गांवर किमान 10 रुपये भाडे असणार आहे. त्यामुळे कमी पैशात मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे.

मेट्रो 2 ए (Mumbai Metro-2 A)आणि मेट्रो 7 (Mumbai Metro-7)हे दोन्ही मेट्रोचे मार्ग जानेवारी 2022 पर्यंत सुरू होतील असा विश्वास MMRDAचे आयुक्त आर. राजीव यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही मेट्रो मार्गावर एकूण 20 किलोमीटर मार्गावर चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. या मेट्रो मार्गावर प्रवास करताना किमान 10 रुपये भाडे मोजावे लागणार असल्याचं आयुक्त आर. राजीव यांनी  स्पष्ट केले आहे.

तर Mumbai Metro-2 A आणि Mumbai Metro-7 हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील 20 ते 25 टक्के वाहतूक कमी होईल तर 10 ते 12 टक्के लोकलमधील गर्दी कमी होईल असा दावा, MMRDAचे आयुक्त आर. राजीव यांनी यांनी केला आहे.

मागे

मुंबईकरांसाठी खूशखबर ! ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट घेता येणार कोविशिल्ड लस
मुंबईकरांसाठी खूशखबर ! ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट घेता येणार कोविशिल्ड लस

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता मुंबईत ४५ वर्षांवरील व्यक्तीं....

अधिक वाचा

पुढे  

दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या
दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

नागपूर शहरात हत्यासत्र सुरुच आहे. शुक्रवारी शहरातील लष्करीबाग परिसरात एका ....

Read more